Video Shows Rasmalai Modak Easy Recipe : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशोत्सव हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी असणार आहे. त्यामुळे सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु आहे. कोणाच्या घरी सजावट तर मंडळातील सार्वजनिक गणपतीचे आगमन होताना दिसते आहे. तर अशातच गणपती बाप्पाला रोज काय नैवैद्य द्यायचा याचं प्लॅनिंग अनेक महिला करताना दिसत आहेत. तर तुम्ही देखील हा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन आलो आहोत. बाप्पाला मोदक आवडतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर यंदा गणपतीसाठी आपण ‘रसमलाई मोदक’ (Rasmalai Modak Recipe ) कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सोशल मीडियावर हरजीत कौर या महिलेने हे मोदक कसे बनवायचे याची सोपी रेसिपी व्हिडीओत ( Video) दाखवली आहे.
साहित्य :
१. २०० ग्रॅम पनीर
२. तीन चमचे पिठी साखर
३. १/२ वाटी मिल्क पावडर
४. पिस्ता
५. गुलाबाच्या पाकळ्या
६. तूप
व्हिडीओ नक्की बघा…
कृती :
१. पनीरचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि बारीक पेस्ट करून घ्या.
२. गॅसवर पॅन ठेवा त्यात तूप व पेस्ट करून घेतलेलं पनीर त्यात घाला.
३. नंतर त्यात तीन चमचे साखर घाला.
४. त्यानंतर मिश्रण एकजीव करून घ्या.
५. त्यानंतर तयार मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यात पिस्ता, गुलाबाच्या पाकळ्या घालून मिश्रण व्यवस्थित मळून घ्या.
६. नंतर तुमच्या आवडीनुसार तुमची या मिश्रणाचे हाताने किंवा साचाच्या मदतीने मोदक बनवून घ्या.
७. अशाप्रकारे तुमचे ‘रसमलाई मोदक’ तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) @sugran_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरवर्षी आपण बाहेरून मोदक खरेदी करतो किंवा घरी तळलेले, उकडीचे मोदक बनवतो. पण, यावर्षी काहीतरी वेगळं करून पाहा आणि तुम्ही देखील बाप्पासाठी घरच्या घरी रसमलाईचे मोदक बनवा.