Ganpati Visarjan 2022 Viral Video: उंदरावर बसून दुडुदुड धावत आलेले बाप्पा १० दिवसांचा पाहुणचार घेऊन आपल्या गावाकडे निघाले. अगदी कितीही नाही म्हंटल तरी विसर्जनाचा क्षण हा प्रत्येक गणेशभक्तसाठी कठीणच असतो. अगदी चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत बाप्पाला निरोप देताना डोळ्याच्या कडा ओलावतातच. असेच काही गोंडस क्षण यंदाच्या गणेशोत्सवात देखील पाहायला मिळत आहेत. बाप्पाला मिठी मारून हुंदके देत रडणारे हे इवलेसे जीव खरोखरच त्यांच्या निरागसतेने आपल्यालाही भावुक करून जातात.
अलीकडेच भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक लहान मुलगी रडताना आणि गणपती विसर्जनाच्या वेळी तिच्या हातातील बाप्पाची मूर्ती सोडण्यास नकार देताना दिसत आहे. मूर्तीला निरोप द्यावा लागल्याने हि चिमुकली खूप रडते आणि तिचा हा गोंडस हट्ट पाहून आपल्याही डोळ्यात पाणी आल्यावाचून रहात नाही.
चिमुकली म्हणते, बाप्पा जाऊ नका
अशाच एक अन्य व्हिडीओमध्ये छोटासा गणेशभक्त बाप्पाचं विसर्जन करताना बाप्पा तू का चाललायस असा सवाल करताना रडत आहे. घरच्या गणेशाचे विसर्जन करताना चिमुकल्याला हुंदके आवरत नाहीत.
बाप्पाला निरोप
काही दिवसांपूर्वी माझी तुझी रेशीमगाठ मधील परी म्हणजेच मायराचा सुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एका गाण्याच्या डबिंगसाठी मायराने रडत बाप्पाला निरोप दिला होता पण या व्हिडिओमध्ये खरोखरच तिच्या डोळ्यातही अश्रू होते हे पाहून तिचे चाहतेही हळवे झाले होते.
माझी तुझी रेशीमगाठच्या ‘परी’ने आईसोबत केलं Twinning; बाप्पा सोबत दिल्या गोंडस पोझ
बाप्पाला निरोप देताना परी झाली भावुक
तुम्हाला हे व्हिडीओ पाहून काय वाटलं आणि बाप्पाला निरोप देताना तुमची स्थिती कशी असते हे आमच्यासह शेअर करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!