झी मराठी वाहिनीतर्फे ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती हा ६४ कलांचा अधिपती आहे. म्हणूनच गणपतीच्या स्वागतासाठी झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्या साठी’, ‘तू चाल पुढं’,‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘दार उघड बये’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘३६ गुणी जोडी’, ‘चला हवा येऊ द्या’ मालिका-कार्यक्रमातील कलाकार आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या छोटय़ा स्पर्धकांनीसुद्धा गणरायाच्या आगमनासाठी केलेल्या या कार्यक्रमात खास सहभाग घेतला आहे. अप्रतिम सूत्र संचालन, सुंदर गायकी व बहारदार नृत्य असलेला हा कार्यक्रम रविवार १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
झी मराठी वाहिनीचा खास सोहळा ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’
झी मराठी वाहिनीतर्फे ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती हा ६४ कलांचा अधिपती आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 17-09-2023 at 03:30 IST
TOPICSगणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Chaturthi 2024गणेशोत्सव २०२४GaneshotsavमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News
+ 1 More
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi channel special ceremony celebration of jollaosh ganaraya ysh