झी मराठी वाहिनीतर्फे ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती हा ६४ कलांचा अधिपती आहे. म्हणूनच गणपतीच्या स्वागतासाठी झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्या साठी’, ‘तू चाल पुढं’,‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘दार उघड बये’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘३६ गुणी जोडी’, ‘चला हवा येऊ द्या’ मालिका-कार्यक्रमातील कलाकार आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या छोटय़ा स्पर्धकांनीसुद्धा गणरायाच्या आगमनासाठी केलेल्या या कार्यक्रमात खास सहभाग घेतला आहे. अप्रतिम सूत्र संचालन, सुंदर गायकी व बहारदार नृत्य असलेला हा कार्यक्रम रविवार १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा