आपल्या शरीरावर त्यातही पोटावर जमणारी चरबी ही आरोग्यासाठी घातक असते , मोठे पोट (कंबरेचा घेर मोठा) असणाऱ्याला वेगवेगळ्या आजारांचा धोका संभवतो, हे आपल्याला ऐकून ऐकून माहीत झाले आहे. मात्र पोटावरील चरबी अनारोग्यास आमंत्रण देते म्हणजे नेमके काय करते हे आपल्याला माहीत नसते. ते जाणून घेऊ.

· मोठे पोट असणाऱ्याला सर्वाधिक धोका संभवतो, तो म्हणजे ’इन्सुलिन-रेसिस्टन्स’चा! ‘इन्सुलिन-रेसिस्टन्स’मध्ये शरीर-कोष इन्सुलिनला जुमानत नाहीत व त्यामुळे रक्तामध्ये साखर वाढत जाते. शरीराला अधिकाधिक इन्सुलिनची निर्मिती करावी लागते व रक्तात वाढलेले हे इन्सुलिनचे प्रमाण केवळ मधुमेहच नव्हे तर हार्ट अटॅकलाही आमंत्रण देते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

· पोटावरील चरबी रक्तामध्ये काही रसायने (केमिकल्स) सुद्धा सोडते, ज्यामुळे शरीर ’मेटाबोलिक सिन्ड्रोम’ या विकृतीच्या दिशेने पुढे जाते.

· पोटावरील चरबीमुळे असे काही हाॅर्मोनल परिणाम होतात की ज्यामुळे त्या व्यक्तीचे स्वतःच्या भुकेवर व खाण्यावरही नियंत्रण राहत नाही.

· पोटावरील चरबी रक्तामध्ये फॅटी-ॲसिड्स (मेद-अाम्ले) सोडते,या फ़ॅटी-ॲसिड्सचेच रुपांतर घातक एलडीएल ( वाईट) कोलेस्टेरॉलमध्ये होते, ज्याचे सूक्ष्म कण रक्तवाहिनीमध्ये रुतून अडथळा (ब्लॉक) तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

· याशिवाय पोटावरील चरबीमुळे रक्तामध्ये अशी काही केमिकल्स स्रवतात ,ज्यांमुळे सूज-प्रक्रिया (inflammatory process) सुरू होते. शरीरामध्ये सूज-प्रक्रिया ही जखम वगैरे भरण्यापुरती तात्पुरती असते, मात्र पोटावरील चरबीमुळे कधीच न थांबणारी अशी सूज-प्रक्रिया सुरू होते.

ही सूज-प्रक्रिया एलडीएल (LDL cholesterol)च्या कणांना एकप्रकारे गंजवून अधिक घातक बनवते.हेच एलडीएलचे कण रक्तवाहिनी चिंचोळी करतात व रक्तवहनामध्ये अडथळा तयार करतात.

एकंदरच पोटावरील चरबी हा आरोग्याला किती भयंकर धोका आहे,हे तुमच्या लक्षात आले असेलच! पुढचे संपूर्ण शतक भारताला ’मोठ्या पोटांच्या’ या समस्येला तोंड द्यायचे आहे.

Story img Loader