हट्टीपणा, जोरजोरात रडणे, खूप वेळ रडणे, सांगितलेले न ऐकणे, उलट वागणे, राग-वैताग येईल असे वागणे, वाद घालणे, उलट उत्तर देणे आणि काही वेळेला धक्काबुक्की किंवा मारामारीही करणे.. अशा प्रकारे वागून मुले पालकांना त्रास देतात. सर्वच मुले पालकांना कधी ना कधी त्रास देतात. त्यांचा त्रास काही वेळापुरता किंवा दिवसांसाठी असतो. पण त्रास खूप दिवस होत राहिला, क्रमाने वाढत असेल किंवा सहन करण्याच्या पलीकडचा असेल तर त्यावर उपाय करायला हवा.

मुले कधी त्रास देतात?
भूक, अपुरी झोप, तहान, थकवा, बदलता दिनक्रम, आजारपण यामुळे मुलांना चीडचीडेपणा येतो. यात मोबाइलसारख्या उपकरणांचे योगदान असू शकते. तीन ते सहा वष्रे आणि पौंगडावस्थेच्या वेळेला मुलांची आक्रमकता नसíगकपणे वाढते. त्याची मानसिक आणि हार्मोनल कारणे असतात. त्या वेळेला त्यांना योग्य हाताळले नाही तर ती त्रास देऊ लागतात. घरातील व्यक्ती जर एकमेकांना त्रास देत असतील तर मुलेही तेच शिकतात. अतिनराश्य आणि अमली पदार्थाचे सेवन या स्थितीतही मुले त्रास देतात.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पालकांची प्रतिक्रिया
दीड वर्षांचे झाल्यावर बाळाला बाहेरच्या जगाची ओळख होते आणि ते मागण्या वाढवू लागते. हट्ट पुरवले की हट्ट करण्याची सवय वाढत जाते. काही मुलांच्या अंगी मुळातच आक्रमकता जास्त असते. त्या मुलांना वळण लावण्यासाठी त्यांचे पालक अतिकडक वागतात. या वागण्याने मुलाची आक्रमकता आणखीन वाढते. काही पालकांची सहनशीलता कमी असते. लहान मुले हट्ट करताना, उर्मट बोलताना खूप गोंडस वाटू शकतात. त्याच्या या वागण्याला चिकाटी किंवा स्मार्टनेस समजून काही पालक त्यांना प्रोत्साहन देतात. हे पालकांना नंतर महागात पडते.

सामाजिक आणि कौटुंबिक कारणे
काही कुटुंबांमध्ये पालक मुलांना शिस्त लावत असताना इतर व्यक्ती हस्तक्षेप करतात. आजीआजोबा मध्ये पडून त्या मुलाचे हट्ट पुरवतात. असे वारंवार झाल्यावरही मुले पालकांना मान देत नाहीत. काही कुटुंबांमध्ये क्लेश, राग, भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण असते. आईचा अपमान किंवा मारहाण होत असते. मुलाला मुठीत ठेवण्यासाठी त्याला मारले जाते, अपमान किंवा दुर्लक्ष केले जाते. क्वचित प्रसंगी लंगिक अत्याचारही होतात. अत्याचारापासून वाचवण्यासाठी त्रास देणे
ही एक हाक असू शकते. अगदी क्वचित काही मुलांमध्ये विघ्नसंतोषी प्रवृत्ती असते. ही मुले पालकांना त्रास देतातच पण आपल्यापेक्षा दुर्बल म्हणजे लहान मुले, मूक प्राणी, वृद्ध माणसे यांना ते त्रास देतात, त्यांची त्रास देण्याची पद्धत क्रूर असते.

मुलांचा त्रास कमी का करावा?
मुलांच्या या वागण्यामुळे पालकांना मानसिक आणि आíथक परिणाम सहन करावे लागतात. या तणावामुळे पालक आजारी पडू शकतात. ही मुले कुठल्याही प्रकारची शिस्त पाळण्यास असमर्थ बनतात. सतत पालकांशी स्पर्धा करून वर्चस्व साधण्याची सवय लागल्यामुळे, ती मुले सगळीकडे अशीच वागू लागतात. त्यांचे कुणाशीही पटत नाही. समोरचे काम सोडून त्रास देण्याकडे कल असल्याने प्रतिभावंत असूनही ती अभ्यास करत नाहीत. काही मुले आपली प्रतिभा गुन्हेगारीकडे वळवतात. त्यातून त्यांना वर्चस्व साधण्याचा आनंद मिळतो.

हे कसे साध्य होईल?
हे प्रश्न चिघळल्यावर मार्गदर्शन घेण्याची पद्धत आहे. अभ्यास करत नाही ही मुख्य तक्रार असते किंवा शाळेकडून बेशिस्तीची तक्रार आल्यावर पालक उपायासाठी धावतात. तपासून पाहिल्यावर मुलांची त्रास देण्याची प्रवृत्ती दिसून येते. या परिस्थितीत मुलांचे समुपदेशन करून काहीही उपयोग होत नाही. पालकांनाच मुलांना हाताळण्याबाबत समुपदेशन करावे लागते. स्थिती सुधारण्यासाठी काही महिने, वर्ष लागू शकतात. त्यात मुलाचा प्रतिकार सहन करावा लागतो. हा प्रतिकार बऱ्याच वेळेला जबरदस्त असल्यामुळे उपचार मधेच सोडावा लागतो. मुलांना चंचलपणा, अतिनराश्य, इतर काही अडचणी-आजार असले तर मात्र उपचार केल्यावर मुलांच्यात चांगला बदल होतो. काही पालक चिकाटीने स्वत:मध्ये बदल करू शकतात, ती मुलेही सुधारू शकतात. लहानपणापासून मुलांच्या वागण्याकडे आणि सवयीकडे लक्ष ठेवावे. मुलांशी नेहमीच, कुठल्याही परिस्थितीत शांतपणे आणि हळू आवाजातच बोलले पाहिजे. मृदू पण ठाम नाही म्हणता आले पाहिजे. नाही म्हटल्यावर मुलांकडून होणारा जोरदार विरोध शांत राहून, पण आपला निर्णय न बदलता हाताळला पाहिजे. सातत्याने असे केल्यावर मुलांना पालकांबद्दल आदर आणि त्यांच्या शब्दाची खात्री पटते. त्यामुळे ती पालकांना त्रास देण्यापासून परावृत्त होतात.

– डॉ. वाणी कुल्हळी
vbkulhalli@gmail.com

Story img Loader