हिवाळ्यात गार हवेच्या लाटा आल्यावर सर्दी, खोकला, तापाचीही साथ येते. त्यातसुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये लोकांना त्रस्त करतो तो कोरडा खोकला. प्रदूषणामुळे कोरडय़ा खोकल्याची तीव्रता वाढू शकते. मात्र काही वेळा प्रदूषण नसतानाही हिवाळ्यामध्ये कोरडय़ा खोकल्याचा त्रास होतो. याचाच अर्थ या कोरडय़ा खोकल्यामागे इतर कारणेसुद्धा आहेत.
हिवाळ्यात विषाणू का वाढतात?
तीव्र सूर्यकिरणांमुळे उन्हाळ्यात जे रोगजंतू तग धरू शकत नाहीत, तेच रोगजंतू हिवाळ्यात हवेमध्ये जो काही ओलावा व गारवा असतो त्यावर दोन-तीन दिवसही जिवंत राहू शकतात. दुसरा मुद्दा म्हणजे पृथ्वीच्या नसíगक ऋतुचक्रामध्ये झालेल्या फेरबदलांमुळे. आजकाल ऋतुबदल सावकाश होत नाही, तर एक-दोन दिवसांतच होतो. कालपरवापर्यंत कडक ऊन असते आणि अचानक गार वारे सुटू लागतात. हा अकस्मात बदल शरीराला तर उपकारक होत नाही, मात्र विषाणूंच्या वाढीस साहाय्यक होतो. पण रोगजंतू शरीरामध्ये शिरले म्हणून केवळ ते आजाराला कारणीभूत होत नाहीत. कारण तसे थोडेफार रोगजंतू आपल्या उध्र्व श्वसनमार्गामध्ये असतातच, मात्र त्यांच्या वाढीस व प्रसारास जेव्हा पोषक वातावरण मिळते तेव्हाच आजार बळावतो.
अयोग्य आहार-विहार हेच कारण
तुमचे शरीर या अकस्मात बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांत असताना त्याला तुम्ही योग्य आहार-विहाराची साथ दिलीत, तर आजार कदाचित टाळता येतीलही, पण तसे होत नाही. शरीराला त्रासदायक होणारा कोरडेपणा व थंडावा कमी करण्यासाठी शरीर जे प्रयत्न करत असते, त्याला साहाय्य होईल असा स्निग्ध व उष्ण आहार घ्यावा, अशी अपेक्षा असताना कोरडा व थंड आहार घेतला तर काय होणार? एकंदरच सुका मेवा, पेस्ट्रीज, वेफर्स, बिस्किटे व पावापासून बनवलेल्या विविध पदार्थाची या दिवसांमध्ये रेलचेल असते. हे सर्व पदार्थ कोरडे आहेत. त्यांच्या विघटनासाठी शरीराला अधिक प्रमाणात ओलाव्याची गरज पडते, जो शरीरामधूनच घेतला जातो. साहजिकच शरीरातले अत्यावश्यक स्राव (जसे श्वसनमार्गातला श्लेष्मल स्राव) मात्र कमी पडतात व श्वसनमार्गातला कोरडेपणा वाढतो.
शीत विहारामध्ये शरीरावर, विशेषत: नाक, सायनस घसा यांवर होणारा थंड-कोरडय़ा हवेचा मारा त्या श्वसनवह अवयवांस त्रासदायक ठरतो. याशिवाय धावत्या वाहनामध्ये प्रवास, दिवसभर वातानुकूलित हवेत काम, वातानुकूलित वाहनामध्ये प्रवास, रात्री झोपताना एसी/पंखा लावून झोपणे हेसुद्धा बाधक होते. शीतत्व शरीराला तर अनुरूप होत नाही, पण शरीराचे (उध्र्व श्वसनमार्गाचे) घटलेले तापमान शीत वातावरणामध्ये वाढणाऱ्या रोगजंतूंच्या; विशेषत: विषाणूंच्या वाढीस व प्रसारास मदतगार होते.
या पाश्र्वभूमीवर एखादी व्यक्ती वातप्रकृतीची असेल तर या सर्व गोष्टींचा प्रतिकूल परिणाम अधिकच होतो आणि ती व्यक्ती कोरडय़ा खोकल्याला बळी पडते. चलनवलनाच्या अभावी व अयोग्य आहाराअभावी रोगप्रतिकारशक्तीमध्ये घट होते आणि अशा दुर्बल रोगप्रतिकारशक्ती झालेल्या मडळींच्या शरीरात शिरलेले रोगजंतू श्वसनविकार निर्माण करतात. वातावरणातली थंडी व कोरडेपणा यामुळे जशी शरीराची बाह्यत्वचा कोरडी पडते, तशीच नाकामधली त्वचासुद्धा कोरडी पडते. अव्याहत सुरू असणाऱ्या, श्वसनावाटे शरीरात शिरणाऱ्या थंडगार हवेचे नाकाच्या आभ्यन्तर त्वचेशी सतत घर्षण होत राहते. त्याच्या व कोरडेपणाच्या परिणामी नाकाच्या आभ्यन्तर त्वचेची श्लेष्मलता (बुळबुळीतपणा) कमी होतो व शेवटी ती कोरडी पडते. नाकाच्या या आभ्यन्तर कोरडेपणामुळे नाकाला आतून सूज येणे, खाज येणे नाकामध्ये वेदना होणे वगरे त्रास संभवतात. या कोरडेपणाला प्रतिबंध म्हणून शरीर नाकाच्या आभ्यन्तर त्वचेद्वारे अतिप्रमाणात श्लेष्मल (बुळबुळीत) स्रावांचे स्रवण सुरू करते, ज्याला आपण सर्दी म्हणतो. सुरुवातीला स्वच्छ-पांढरा-पातळ असणारा हा स्राव रोगजंतूंच्या वाढीस पोषक ठरतो, स्रावामध्ये रोगजंतू आणि त्यांच्याशी लढणाऱ्या श्व्ोतपेशींचे प्रमाण वाढते आणि स्राव चिकट-पिवळा-घट्ट होतो व आपण म्हणतो, सर्दी पिकली.
या जंतुसंसर्गावर सर्वसाधारण उपचार म्हणून प्रतिजैविके (अॅन्टिबायोटिक्स) दिली जातात. कारण ही प्रतिजैविके रुग्णाला लाभ करण्याऐवजी श्वसनमार्गातले श्लेष्मल स्राव पूर्णपणे सुकवून टाकतात आणि अत्यावश्यक स्राव कमी झाल्यामुळे जो कोरडा खोकला सुरू झालेला असतो, तो पुन्हा सुरू होतो.
वैद्य अश्विन सावंत
drashwin15@yahoo.com
प्रतिबंध व उपचार
*दिवसभर सोसेल इतपत गरम पाणी प्यावे. थंड पाणी व पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
*गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये एक चमचा तूप (उपलब्ध असल्यास ज्येष्ठीमधादी तूप)मिसळून ते मिश्रण एक एक चमचा वारंवार गरम गरम प्यावे.
*अंगावर उबदार कपडे घाला, त्यातही थंडी असेल तेव्हा चेहरा, घसा, छाती झाकली जाईल व शरीरात ऊब राहील याची दक्षता घ्या.
*रात्री झोपण्याच्या खोलीतील वातावरण ऊबदार ठेवा.
*रात्री झोपताना अंगाला, त्यातही श्वसनमार्गाला थेट वारा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
*सुंठ उगाळून त्याचा लेप नाक-गाल-घसा-छातीवर लावावा किंवा नुसतेच सुंठचूर्ण चोळावे.
*वारंवार घसा बसतो-दुखतो त्यांनी या दिवसांमध्ये बोलणे मर्यादित ठेवावे व बोलण्याचा ध्वनी नियंत्रणात ठेवावा.
*सकाळ-सायंकाळ कोमट पाण्यात हळद-मीठ टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात, उपचार म्हणून दिवसातून चार वेळा.
*कृश शरीराच्या तसेच थंडी बाधणाऱ्यांनी शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे पदार्थ कटाक्षाने टाळून आहारामध्ये स्निग्ध पदार्थाचे सेवन वाढवावे.
*मसुरीचे वा उडदाचे गरमागरम कढण त्यामध्ये लोणकढे तूप टाकून सकाळ-सायंकाळ प्यावे.
*वातप्रकृती व्यक्तींनी स्निग्ध पदार्थ नित्य सेवनामध्ये ठेवावे. उदा. दूध, दही, ज्वारी, गहू, मसूर, उडीद, तीळ, मोहरी, अळशी, कांदा, केळे, नारळ, डािळब, खजूर, कोंबडय़ाचे वा बकऱ्याचे मांस, तिळाचे तेल, अळशीचे तेल, गूळ.