मधुमेह एक असा आजार आहे की, ज्याने आपले जग बऱ्यापकी व्यापून टाकले आहे. त्यात ही आयुष्याला चिकटलेली व्याधी. साहजिकच मनात अनेक प्रश्न उभे राहतात. डॉक्टरांकडे आपण जातो खरे, पण त्या जेमतेम अध्र्या तासाच्या मुलाखतीत आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतातच असे नाही. अशीच राहून गेलेली जळमटे दूर करण्याचा, गरसमज नाहीसे करण्याचा हा प्रयत्न ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दर पंधरवडय़ाला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मधुमेह म्हणजे काय?
आपल्या सगळ्यांच्या रक्तात ग्लुकोज नावाची साखर असते. शरीरातल्या सर्व पेशींना आपल्या कामासाठी लागणारी बहुतांशी ऊर्जा या ग्लुकोजपासून मिळते. अनेक नैसर्गिक यंत्रणा ग्लुकोजचे प्रमाण एका विशिष्ट मर्यादेत राखण्याचे काम करीत असतात. जेव्हा या यंत्रणा काही कारणाने बिघडतात, तेव्हा रक्तातली ग्लुकोजची मात्रा वाढते. हाच मधुमेह.
ग्लुकोज वाढण्यामागे एकच कारण असते असे नाही. त्यामुळे मधुमेह होण्याचीही अनेक कारणे दिसतात. अर्थात कारणे वेगवेगळी असली तरी अंतत: होणारे दुष्परिणाम सारखेच असतात. वेगळ्या भाषेत सांगायचे तर जसजशी रक्तातली ग्लुकोज वाढत जाते, तसतसा रक्तात अधिकाधिक साखरेचा पाक तयार होत जातो. आपले रक्त संपूर्ण शरीरभर फिरत असल्याने जवळजवळ प्रत्येक इंद्रियावर मधुमेहाचा परिणाम दिसून येतो.  

मधुमेहापासून बचाव कसा करता येईल?
नियमित व्यायामाला योग्य आहाराची जोड दिली तर हे अशक्य नाही. सोबत मानसिक तणाव कमी ठेवण्यासाठी योग किंवा ध्यानधारणाही आवश्यक आहे. मात्र या सगळ्याची सुरुवात खूप लहान वयात करावी लागेल. कारण आशियाई देशांमध्ये फारच कमी वयात मधुमेह होतो. आणि ग्लुकोज मर्यादित करणाऱ्या यंत्रणांमधल्या बिघाडाची सुरुवात व प्रत्यक्षात रक्तातली ग्लुकोज वाढणे यात साधारणत: दहा वर्षांचा कालावधी जातो. या काळात काळजी घेतली तर किमान मधुमेह कमी वयात तरी होणार नाही.  

काही मुलांना मधुमेह झाल्यावर इन्सुलिन घ्यावे लागते?
काही मुलांना इन्सुलिन घ्यावे लागते. ते का, हे समजून घ्यायला काही मूलभूत गोष्टींचा उलगडा करावा लागेल. रक्तातले ग्लुकोज मर्यादित राखण्यासाठी ज्या यंत्रणा काम करतात, त्यात दोन हॉर्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. इन्सुलिन ग्लुकोज वाढू देत नाही, तर ग्लुकेगोन ते फार खाली येऊ देत नाही. हे दोन्ही हॉर्मोन्स स्वादुिपडात बनतात. काही कारणाने जेव्हा हॉर्मोन्स बनवणाऱ्या पेशींवर गदा येते आणि त्या नष्ट होतात, तेव्हा इन्सुलिन बनत नाही. साहजिकच रक्तातले ग्लुकोजचे प्रमाण अनियंत्रित होते. वैद्यकीय भाषेत याला ‘टाइप वन मधुमेह’ म्हणतात. आता शरीरात इन्सुलिन बनतच नाही म्हटल्यावर ते बाहेरून पुरवणे क्रमप्राप्तच असते.  हॉर्मोन्स बनवणाऱ्या पेशी नष्ट करण्याचे काम आपल्याच शरीराची प्रतिकारशक्ती करते. त्या पेशींना गरसमजाने परकीय मानते, त्यांच्यावर हल्ला करते आणि त्यांचा नायनाट करते. हा सारा प्रकार वयाच्या दहा ते बारा या वर्षी प्रामुख्याने घडतो. आता मात्र असे आढळून आले आहे की, हे कुठल्याही वयात घडू शकते. वाढत्या वयात असे घडले म्हणजे त्याला लाडा (Latent Autoimmune Diabetes of Adult)  असे म्हणतात.

मधुमेह आनुवंशिक आहे?
मधुमेह होण्यामागे निव्वळ एखाद्या जीन्समधला बिघाड असल्याचे दिसत नाही. कुठल्याही आनुवंशिक आजारात एखाद्दुसऱ्या जीन्सचा गळा पकडता येतो. मधुमेहाबाबत तसे म्हणता येत नाही. निदान आजपर्यंत तरी असे आढळून आलेले नाही. जीन्सना पोषक वातावरणाची जोड मिळाली की मधुमेह होतो, असे लक्षात आले आहे. याचाच अर्थ पोषक वातावरण नसेल तर कदाचित आई-वडिलांना मधुमेह असला तरी मुलांना तो होईलच असे नाही. अर्थात तुम्ही एकदम निर्धास्त होऊ नका. कारण आकडेवारी सांगते की, जर पालकांना मधुमेह असेल तर मुलांना तो व्हायची शक्यता अधिक असते. दोन्ही पालकांना असल्यास ती आणखी दुणावते. साधारण कुठल्याही एका घरात वातावरणही सारखे असते, खाण्यापिण्याच्या सवयीही समान असतात म्हणून हे दिसत असेल. इथे कबूल करायला हवे की, हे उत्तर तसे ढोबळ आहे. कारण काही विशिष्ट जीन्सच्या बिघाडामुळे होणाऱ्या आजारांमध्ये मधुमेहदेखील झाल्याचे दिसते. सुदैवाने या आजारांचे प्रमाण अत्यल्प आहे.
 डॉ. सतीश नाईक