काही जीवाणूंमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धी जीवाणूंचे पेशीय आवरण नष्ट करण्याची क्षमता असते. हे काम हे जीवाणू स्वत:च तयार करीत असलेल्या एका विशिष्ट एन्झाइमद्वारे करतात. विशेष म्हणजे या एन्झाइममुळे त्यांना स्वत:ला काहीही धोका नसतो.
‘युमिआ युनिव्हर्सिटी’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’ यांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.         ‘सायन्स डेली’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या अभ्यासाच्या निष्कर्षांनी नवीन प्रकारची जीवाणूरोधक औषधे बनविण्यासाठी दिशा स्पष्ट झाली आहे. घातक जीवाणूंचा दुसऱ्या प्रकारच्या जीवाणूंचाच वापर करून नाश करणे, ही संकल्पना या संशोधनाने मांडली आहे. रोगकारक जीवाणू एखाद्या सजीवाच्या शरीरात संक्रमण करतात तेव्हा ते काही विषारी घटकांचे स्त्रवण करून त्या सजीवाच्या शरीरातील पेशी आणि उतींचे नुकसान करीत असतात. संक्रमणाची हीच पद्धत जीवाणूंच्या आपसांत होणाऱ्या लढतींतही पाहायला मिळते. जीवाणूंकडे इंजेकशनच्या सुईप्रमाणे काम करणारी स्त्रवण यंत्रणा असते. त्याद्वारे विषारी पदार्थ दुसऱ्या जीवाणूच्या पेशीत सोडता येतात. जीवाणूंमधील ज्ञात असणाऱ्या स्त्रवण प्रणालींपैकी ‘टाईप VI’ ही प्रणाली जीवाणूंच्या आपापसांतल्या लढाईत वापरली जाते. ही प्रणाली जीवाणूंच्या अनेक प्रजातींमध्ये आढळते.
नव्या संशोधनानुसार या टाईप VI प्रणालीद्वारे ‘फॉस्फोलिपॅसेस’ या एन्झाइमचे स्त्रवण केले जाते आणि ते प्रतिस्पर्धी जीवाणूंसाठी धोक्याचे ठरते. पण ज्या जीवाणूने त्या एन्झाइमचे स्त्रवण केले आहे त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा