दिवसा उकाडा जाणवू लागला असला तरी अजुनही रात्री थंडी आणि बोचरे वारे आहेतच. गार हवेत फिरून आल्यानंतर होणाऱ्या मांसपेशींच्या आणि सांध्यांच्या दुखण्यावर घरच्या घरी पुढील प्राथमिक उपाय करून पाहता येतील-
१) लवंग तेलाची मालिश : एक चहाचा चमचा खोबरेल तेलात लवंग तेलाचे १० थेंब मिसळावेत. या तेलाने दुखऱ्या भागावर हलक्या हाताने दिवसातून ३-४ वेळा मालिश करावी.
२) सुंठीच्या तेलाची मालिश : अर्धा कप तिळाच्या तेलात चहाचा १ छोटा चमचा भरून सुंठ घालावी. हे तेल गॅसवर त्यातील सुंठीची पूड जळून काळी होईपर्यंत तापवावे. त्यानंतर हे तेल बाटलीत भरून ठेवावे आणि जेव्हा लावायचे असेल तेव्हा कोमट करून घ्यावे. दिवसातून ३-४ वेळा या तेलाने मालिश करावी. १५-२० मिनिटांनंतर दुखरा भाग गरम कपडय़ाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने शेकून घ्यावा.
३) मोहरीची पट्टी :  पाठीत किंवा कमरेत थंडीने चमक भरल्यास मोहरीची पट्टी करावी. मोहरी वाटून त्यात त्याच्या तीनपट गव्हाचे पीठ आणि पाणी घालून पेस्ट करावी. सुती कापडावर ही पेस्ट पसरून हे कापड दुखऱ्या भागावर
१५-२० मिनिटे ठेवावे. मोहरीच्या पेस्टचा त्वचेशी थेट संपर्क येऊ देऊ नये. या पट्टीमुळे त्वचा थोडी लाल होऊ शकेल किंवा जराशी आग होईल. असे झाल्यास त्यावर बेबी पावडर लावल्याने बरे वाटेल.

Story img Loader