चाळीशीतच दुसऱ्या ग्रेडचा, इस्ट्रोजेन – प्रोजेस्ट्रेरॉन – हर टूरिसेफ्टर पॉझिटिव्ह असलेला स्तनाचा कॅन्सर झालेल्या भरवीला स्तननिर्हरण, केमोथेरॅपीची सहा सायकल्स, रेडियोथेरॅपी व त्यानंतर हरसेफ्टीनची बारा इंजेक्शन अशा अनिवार्य दुष्टचक्रातून जावे लागले. परिणामी पचनात झालेला बिघाड, झोपेची तक्रार, संपूर्ण शरीरास जाणवणारा कोरडेपणा व हातापायांना येणाऱ्या मुंग्या असे दुष्परिणाम चिकित्सेला बराच काळ उलटून गेला तरी कमी झाले नाहीत. दैनंदिन जीवनात व्यत्यय आणणाऱ्या या तक्रारी ंनाकंटाळून भरवीने आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरु केली. केमोथेरॅपी व हार्मोनल चिकित्सेमुळे शरीरात वाढणारी उष्णता, विषाक्तता यांचे तात्काळ व दूरगामी, दुष्परिणाम कमी होण्यासाठी आयुर्वेदीक शमन, रसायन चिकित्सा, पंचकर्म, पथ्यकर आहारविहार, सकारात्मक दृष्टिकोन, योगासने या सगळ्याचा साकल्याने चांगला उपयोग होतो हे तिलोसमजावून सांगितले. हे सर्वचिकित्सा उपक्रम आपल्या आयुष्याचाच एकभाग आहे ह ेपटवून घेऊन त्यांचे यथोचित पालन केल्यामुळे भरवीच्या आयुष्याची गुणवत्ता चांगल्याप्रकारे सुधारली आह ेव आता पूर्वीप्रमाणेच ती आपले दैंनदिन, कौटुंबिक, व्यावसायिक व सामाजिक व्यवहार मोठया हिरिरीने पार पाडत आहे.
रेडिएशन व केमोथेरॅपीसह आयुर्वेदिक चिकित्सा –
पित्त व रक्तातील वाढलेल्या उष्णतेचे शमन करणारी कामदुधा, प्रवाळ, मौक्तिक भस्म, चंद्रकला रस, चंदन, वाळा, अनंतमूळ, कमळ अशी औषधे, सिद्ध घृत, औदुंबरावलेह, साखरेच्या पाकात केलेले औषधी कल्प दीर्घकाळ चालू ठेवणे हितकर ठरते.
रेडिएशन व केमोथेरॅपीसह पथ्यकर आहार –
रेडिएशन व केमोथेरॅपी यांमुळे मुख- जिव्हा, गाल, अन्ननलिका, आमाशय, आतडे, गुद व त्वचा या अवयवांत प्राधान्याने पित्तवर्धक लक्षणे निर्माण होत असल्याने मऊ- हलका असा शामक आहार या कालावधीत रुग्णास उपयुक्त ठरतो. तुपावर भाजलेल्या तांदळाची पेज, मुगाचे वरण, मिरची- गरम मसाला न घातलेल्या, साजूक तुपाची फोडणी दिलेल्या उकडलेल्या भाज्या, फुलके, भाज्यांचे सूप, गोड ताजे ताक, लोणी, नाचणीचे सत्त्व यांचा आहारात मोठय़ा प्रमाणात वापर करावा. गाईचे दूध, गोड- ताजी द्राक्षे, डािळब, अंजीर अशी रसाळ व गोड फळे, साळीच्या लाह्या, चंदन व वाळा घातलेले उकळून थंड केलेले पाणी यांचा आहारात समावेश करावा. एकाच वेळी भरपेट न जेवता दर ३-३ तासांनी थोडा थोडा आहार घ्यावा. जेवतानाही आजूबाजूचे वातावरण प्रसन्न असावे. सर्व अंगाचा दाह अधिक प्रमाणात होत असल्यास गुलकंद, मोरावळा, धण्याचे पाणी व चंदन घातलेले पाणी यांचाही वापर करावा. या काळात शक्ती टिकून राहावी म्हणून दिवसभर साध्या पाण्याऐवजी सुवर्णसिद्ध जल घ्यावे.
रेडिएशन व केमोथेरॅपीसह पथ्यकर विहार
रुग्णाने विशेषत: उष्ण ऋतूत या चिकित्सा पद्धतींचा अवलंब करताना घराच्या िभती/ पडदे यांवर वारंवार थंड पाणी िशपडून घरात शैत्य निर्माण करावे. गुलाब, कमळ यांसारख्या मनास आल्हाद देणाऱ्या फुलांनी घर सुशोभित करावे. कोंदट- उबदार खोलीत झोपू नये. दिवसा झोपणे व रात्री जागरण वज्र्य करावे. सर्वागाचा किंवा विशिष्ट अवयवाचा दाह होत असल्यास चंदनाचा लेप लावावा किंवा त्या स्थानी केळीची पाने गुंडाळावीत. ज्या भागावर रेडिएशन चिकित्सा चालू आहे त्या भागावर मात्र काहीही लावू नये. डोळ्यांची आग होत असल्यास निरसे दूध किंवा गुलाबपाण्याच्या घडय़ा डोळ्यांवर ठेवाव्यात. सर्वागाचा दाह कमी करण्यासाठी तळपायाला गाईचे तूप काशाच्या वाटीने चोळावे. नित्यनियमाने खोबरेल तेल डोक्यास चोळावे. फिकट रंगाचे सुती व सुटसुटीत कपडे घालावेत. या कालावधीत रुग्णाने स्वत:च्या शक्तीचा विचार करून सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत सोसवेल इतकेच फिरावे.
’ रेडिएशन व केमोथेरॅपीसह पथ्यकर मानसिक संतुलन
रेडिएशन व केमोथेरॅपी सुरू होण्यापूर्वीच रुग्ण कॅन्सरच्या व या चिकित्सा पद्धतींच्या संभाव्य दुष्परिणामांच्या भीतीने गलितगात्र झालेले असतात. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी सात्त्विक वाचन, संगीत यांसारख्या गोष्टींत रुग्णांचे मन गुंतविण्याचा प्रयत्न करावा. रुग्णांना एकटेपणा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी. योगासने, प्राणायाम यांच्या साहाय्याने मानसिक संतुलन साधावे. संताप, चिंता हेही विशेषत: पित्तप्रकोपाचा हेतू असल्याने या कालावधीत रुग्णाने स्वत: व त्याच्या नातेवाईकांनीही रुग्णाच्या मनास आल्हाद मिळेल अशा उपक्रमांचे पालन करावे.
’ रेडिएशन व केमोथेरॅपीच्या दुष्परिणामांसाठी पंचकर्म व अन्य अनुषंगिक उपक्रम –
सर्वसामान्यपणे रेडिएशन व केमोथेरॅपी चालू असताना रुग्णाचे बल चांगले नसते. अशा वेळी पंचकर्म चिकित्सा करणे योग्य नसते. मात्र रेडिएशन व केमोथेरॅपीचे दूरगामी दुष्परिणाम प्रामुख्याने वातदोषाच्या रुक्षतेमुळे व पित्तदोषाच्या उष्णतेमुळे निर्माण होत असल्याने ते आटोक्यात आणण्यासाठी वातपित्तशामक तेलाने किंवा तुपाने मसाज, स्वेदन, नस्य, बृंहण बस्ति, शिरोधारा व त्याजोडीला मुखाच्या कॅन्सरमध्ये औषधी काढय़ांच्या गुळण्या, तोंडाला आतून औषधी तेल किंवा तूप लावणे हे उपक्रम लाभदायी ठरतात.
थोडक्यात, समन्वयात्मक उपचार पद्धती हे कॅन्सर रुग्णांसाठी एक वरदानच आहे.