अन्नपदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या पॅसिफिक कॉड माशातील एका प्रथिनामुळे पूरस्थ ग्रंथी म्हणजे प्रॉस्टेटच्या कर्करोगासह इतरही कर्करोगांना अटकाव होतो, असे वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. या संशोधनात एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही मोठा वाटा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड स्कूल ऑफ मेडिसिनचे हाफिझ अहमद हे या संशोधन निबंधाचे प्रमुख लेखक आहेत. अर्बुदविरोधी गुणधर्म असलेल्या नैसर्गिक आहार पदार्थाचा वापर करणे हे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे. कर्करोगाला अटकाव करणारे अन्न तयार करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ मरिन अँड एनव्हिरॉनमेंटल टेक्नॉलॉजी या संस्थेत ते वैज्ञानिक म्हणून काम करतात. कर्करोगाच्या पेशी आजूबाजूच्या उतींवर हल्ले करतात व तेथून जवळच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरतात याला मेटॅस्टॅसिस म्हणतात. त्यामुळे अनेक लोक मरण पावतात. बायोअ‍ॅक्टिव्ह टीएफडी हे रसायन पॅसिफिक कॉडमध्ये असते त्यात ग्लायकोपेप्टाइड असतात ते प्रॉस्टेटच्या कर्करोगाला अटकाव करतात. टीएफडी म्हणजे थॉमसन फ्रेडेनरिच डायसॅकराईड हे प्रतिजन माशातील प्रथिनात सापडते, ते माणसाच्या पेशीतही सुप्त स्वरूपात असते. कर्करोग पसरताना ते कर्करोगग्रस्त पेशींच्या पृष्ठभागावर येते. नॉर्दर्न कॉडसारख्या ध्रुवीय माशांत ग्लायकोप्रोटिन असतात ते टीएफडी प्रतिजनाने (अँटीजेन) युक्त असतात. त्यामुळेच हे मासे गोठत नाहीत. संशोधकांच्या पथकाला असे आढळून आले की, विशिष्ट प्रकारचे टीएफडी म्हणजेच टीएफडी १०० पॅसिफिक कॉड माशापासून तयार केले जाते. हे टीएफडी १०० प्रतिजन प्रॉस्टेट कर्करोगात जास्त प्रमाणात आविष्कृत होणाऱ्या गॅलेक्टिन-३ या प्रथिनाला चिकटते व त्याची क्रिया पेशींच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या प्रतिजनाशी होऊ देत नाही. गॅलेक्टिन-३ हे कर्करोग पेशींना रक्तपेशींच्या भित्तिकांना चिकटून राहण्यास मदत करते व क्रियाशील टी पेशींना मारते. टी प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी या कर्करोग पेशींना शरीरात पसरण्यास व प्रतिकारशक्तीवर हल्ला करण्यास मदत करीत असतात. टीएफटी १०० मुळे कर्करोग पेशी रक्तवाहिन्यांना चिकटू शकत नाहीत. अहमद यांच्या प्रयोगशाळेत काम करणारे प्रसून गुहा हे या संशोधन निबंधाचे एक प्रमुख लेखक आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड ग्रीनबॉम कॅन्सर सेंटरचे डॉ. धन व्ही कालवाकोलानू व त्यांच्या सहकाऱ्यांनीही या संशोधनात मोलाचा हातभार लावला आहे.

beneficiary consumers ignoring to purchase home from affordable housing scheme
विश्लेषण : परवडणाऱ्या घरांचे गणित का बिघडले? लाभार्थी ग्राहक योजनांकडे पाठ का फिरवत आहेत?
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
marine heat waves
समुद्राखाली २०० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या सागरी उष्णतेच्या लाटांचा अभ्यास संशोधकांनी का केला?
Smart insulin
Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?
vaccination campaign launched reduce obesity among obese unemployed youth In Britain
लठ्ठ बेरोजगारांचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ‘बोजा’! सडपातळ आणि रोजगारक्षम बनवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवणार?
Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
cancer vaccine marathi news
विश्लेषण: कर्करुग्णांसाठी आशेचा किरण? नवी लस लवकरच उपलब्ध होणार?
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…