प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या बिसफेनॉल ए या रसायनामुळे स्तनाचा कर्करोग होतो असे फ्रान्सच्या अन्नसुरक्षा संस्थेने म्हटले आहे. गर्भवती महिलांनी बिसफेनॉल असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये साठवलेले अन्नपदार्थ किंवा पेयांचे सेवन केले तर त्यांच्या गर्भावस्थेतील मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो अशा मुलांना नंतरच्या काळात स्तनाचा कर्करोग होतो. यापूर्वी या रसायनाचा संबंध मेंदू व चेतासंस्थेच्या विकारांशी व लठ्ठपणाशी जोडण्यात आला आहे. एनएनईएस या संस्थेने म्हटले आहे की, गर्भवती महिलांनी प्लास्टिकच्या कंटेनेरमधील साठवलेले अन्न खाणे टाळावे तसेच पॉलिकाबरेनेट वॉटर फाउंटनचे पाणी टाळावे कारण प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्याने बिसफेनॉल ए हे रसायन शरीरात जाते. बिसफेनॉल ए हे रसायन कॅश रजिस्टर स्लीपच्या थर्मल पेपरमध्ये असते त्यामुळे त्याला स्पर्श केला तरी शरीरात येऊ शकते. बिसफेनॉल ए रसायनामुळे गर्भावस्थेतच मुलांच्या स्तनग्रंथीत बिघाड होतो. स्त्री व पुरुष अशा दोन्ही लिंगाच्या बाळांना आयुष्यात पुढे कर्करोग होण्याची शक्यता असते. बेबीफूड पॅकेजिंगसाठी बिसफेनॉल ए (बीपीए) युक्त प्लास्टिकचा वापर करण्यास फ्रान्सच्या पार्लमेंटने २०१३ मध्ये बंदी घातली असून फूड कंटेनेरवर २०१५ पासून बंदी घातली आहे. युरोपीय महासंघ, अमेरिका व कॅनडा यांनी बेबी बॉटल्सवर अगोदरच बंदी घातली आहे. प्लास्टिकमध्ये अजूनही बीपीएचा वापर चालू असून त्यावर सरसकट बंदी घालण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. बिसफेनॉलचे एम, एस, बी, एपी, एएफ, एफ व बीएडीजीई असे अनेक प्रकार असून त्यांचा वापर पर्याय म्हणून करणे धोकादायक आहे असा इशाराही या संस्थेने दिला आहे.

Story img Loader