कोलेस्टेरॉल हा काय प्रकार असतो?
अगदी साध्या भाषेत सांगायचं तर कोलेस्टेरॉल म्हणजे रक्तातल्या चरबीचा एक भाग. आपल्या शरीराला हार्मोन बनवायला, ठराविक तेलात विरघळणारी जीवनसत्त्वे मिळवायला आणि थंडीपासून बचावासाठी त्वचेखाली चरबीचा थर तयार करायला तलं लागतात. परंतु या तलांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे प्रत्येक पेशीसाठी िभती उभ्या करणं. त्यामुळं ही तलं नसतील तर पेशी तयार होऊच शकणार नाहीत. ट्रायग्लिसराइड, फोस्फोलिपीड अशी अनेक तलं आपल्या शरीरात असतात. कोलेस्टेरॉल हा या सगळ्या तल कुटुंबाचा एक सदस्य म्हणता येईल. तो सर्वात प्रसिद्ध आहे कारण त्याचं उपद्रवमूल्य फार आहे इतकंच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे उपद्रवमूल्य नेमकं काय?
आता प्रत्येक पेशींसाठी िभती निर्माण करायचं म्हटल्यावर कोलेस्टेरॉल जिथं तयार होतं, तिथून ते शरीरभर वाहून न्यावं लागणार हे निश्चित. प्रश्न असा असतो की तेल आणि पाणी एकमेकांचे शत्रू. ते एकमेकात मिसळत नाहीत. मग रक्तातल्या द्रावाशी तरी तेल कसं जुळवून घेईल. अशा वेळी निसर्गानं मस्त चलाखी केलीय. ही तलं प्रोटिनच्या वेष्टनात गुंडाळली. प्रोटिनचा वरचा पापुद्रा पाण्यात विरघळतो, त्यामुळं आत दडलेली तलं कुठंही वाहून नेणं शक्य होतं. ती योग्य जागी पोचली तर प्रश्न नसतो. नको त्या जागी त्यानी बस्तान बसवलं म्हणजे ती जागा विनाकारण अडते. तसं कुठंही जास्त प्रमाणात गेलं तर वाईटच. यकृतात चरबी वाढली तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. परंतु सर्वात मोठी समस्या तेव्हा उभी राहते, जेव्हा रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्टेरॉलची पुटं चढतात. आधीच रक्ताला शरीरात सर्व ठिकाणी पोहोचायची लगबग असते. वाट थोडी लहान झाली, तर रक्ताची वाहतूक थंडावते. पदपथ अनधिकृत बांधकामांनी अडवल्यावर रस्त्यावरील वाहतूक अडते तसा हा प्रकार. वाट पूर्णत: बंद झाली मग रक्त पुढं जाणार कसं, पुढच्या इंद्रियाला ते मिळणार कसं. इतर इंद्रियांचं थोडं नुकसान झालेलं चालून जातं. पण हृदय, मेंदू, मूत्रिपड अशा अतिमहत्त्वाच्या इंद्रियांचा रक्तपुरवठा थांबला तर अनर्थ होतो. हृदयरोग, लकवा किंवा मूत्रिपड निकामी होणं असे प्रकार होतात.

कोलेस्टेरॉल केव्हा आणि कसं तपासावं?
प्रथम हे समजून घेतलं पाहिजे की अनेक जण याबाबत गोंधळात असतात. ते नुसतं टोटल कोलेस्टेरॉल करून घेतात. परंतु प्रत्यक्षात महत्त्वाची असते ती संपूर्ण तल कुटुंबाची तपासणी. याला वैद्यकीय भाषेत लिपीड प्रोफाईल म्हणतात. यात हृदयाच्या दृष्टीनं सगळ्यात घातक असं एलडीएल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड, हृदयाला चांगलं असं एचडीएल कोलेस्टेरॉल वगरे सगळ्याच तल घटकांची माहिती मिळते. म्हणून त्याचीच तपासणी व्हावी. नुसत्या टोटल कोलेस्टेरॉलचा उपचाराच्या दृष्टीने काहीच उपयोग नसतो. यातल्या सर्वच घटकांच्या मोजणीमध्ये उपासाची गरज पडत नाही. बारा तासांचा उपवास लागतो तो ट्रायग्लिसराइडसाठी. कारण आपण जेवल्यानंतर जे तेल आणि ग्लुकोज रक्तात येते त्यांचं ट्रायग्लिसराइडमध्ये रूपांतर होतं आणि अशा प्रकारे तयार झालेल्या ट्रायग्लिसराइडचा निचरा व्हायला साधारण बारा तास लागतात. त्यानंतर खरं उपाशी पोटीचं ट्रायग्लिसराइड किती ते कळतं.

कोलेस्टेरॉल किती असलं पाहिजे?
कालपर्यंत विचार वेगळा होता. २०१४ सालापर्यंत एलडीएल कोलेस्टेरॉल सामान्य माणसामध्ये १००च्या आत आणि मधुमेहींमध्ये ७०पेक्षा कमी असावं, असं सांगितलं जायचं. आता वेगळा विचार पुढे आला आहे. नवनव्या संशोधनाचा आधार घेत जगभरच्या डॉक्टर मंडळीना मार्गदर्शक तत्वं सांगणाऱ्या अमेरिकन डायबेटीस असोसिएशनने २०१५मध्ये भलामण केलीय. त्यात असं म्हटलं आहे की रुग्णाला हृदयरोग होण्याची कितपत शक्यता आहे यावर कोलेस्टेरॉलचे उपचार अवलंबून ठेवा. तशी जरा शक्यता वाटली तर, त्या रुग्णाला औषध द्या, मग त्याचं कोलेस्टेरॉल कितीही असो. भारतीय डॉक्टर यावर नेमकी कुठली भूमिका घेतात ते अजून गुलदस्त्यात आहे.

यावर उपचार आहे का?
कोलेस्टेरॉलवर खात्रीलायक उपचार आहेत. डॉक्टर अगदी पज लावून तुमचं कोलेस्टेरॉल खाली आणू शकतील इतकी या औषधांची हमी देता येते. फक्त एकच लक्षात ठेवायला हवं. ही औषधं आयुष्यभर चालू ठेवावी लागतात. ज्याक्षणी ती बंद कराल, त्या क्षणी त्यांचा फायदा मिळणं थांबतं. कोलेस्टेरॉल काबूत ठेवणं याला हृदयरोगाची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्व आहे. हे एकच पाऊल उचलून तुम्ही तुमची हृदयरोगाची शक्यता ५० टक्क्यांनी खाली आणू शकता यातच काय ते समजा.