* पाव चमचा सुंठ व अर्धा चमचा वेखंड यांची पाण्यात कालवून पेस्ट करावी. कपाळ, नाक आणि कानशिलांवर हा लेप लावावा.
* गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घ्यावी.
*पाण्यात नॅपकिन बुडवून पिळून घ्यावा आणि तो १ मिनिट मायक्रोवेव्हमध्ये गरम करावा. अशा सोसवेल इतक्या गरम नॅपकिनने चेहरा शेकावा.
* अर्धा कप गरम पाण्यात पाव चमचा मीठ टाकावे. मान कलती करून या पाण्याचे २-३ थेंब कापसाच्या बोळ्याने नाकात सोडावेत.
* १ ग्लास गरम पाण्यात पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
* १ ग्लास पाण्यात पुदिन्याची १५-२० पाने टाकून उकळून गाळून घ्यावे. या काढय़ात १ चमचा मध घालून त्याने गुळण्या कराव्यात.
* गरम पाणी, सूप, चहा, कॉफी अशी गरम पेये घ्यावीत.
* पाव किलो लाल भोपळा, ६-८ लसूण पाकळ्या, १ टीस्पून किसलेले आले, ७-८ काळे मिरे (ठेचलेले) हे सर्व पाणी घालून एकत्र उकळावे व त्यात किंचित मीठ घालून दिवसभर सूपसारखे थोडे- थोडे पीत राहावे.
*पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ एकत्र करून सकाळी व संध्याकाळी गरम पाण्याबरोबर पोटात घ्यावे.
* ३-४ काळे मिरे (ठेचलेले), मध्यम आकाराचे १ तमालपत्र, अर्धा इंच लांबीचा दालचिनीचा तुकडा, पाव चमचा हळद आणि उपलब्ध असल्यास गवती चहा या पदार्थाचा दोन कप पाण्यात उकळून काढा करून घ्यावा. या काढय़ाचे तीन भाग करून सकाळी, दुपारी व संध्याकाळी त्यातील एक भाग गरम- गरम प्यावा. लहान मुलांना हा काढा द्यायचा असल्यास त्यात साखर किंवा मध घालता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा