इन्शुलीन कुठे घेणं चांगलं?
साधारणत: इन्शुलीन दंडावर, मांडीवर अथवा पोटावर देतात. ते स्नायूंमध्ये दिलं जात नाही. त्वचेच्या खाली दिलं जातं. यासाठी पोटाचा भाग सगळ्यात चांगला. एकतर स्वत:चं स्वत:ला घेत येतं आणि पोटावर मज्जारज्जू कमी असल्यानं फारसं दुखतही नाही. तिथं जागाही अधिक असल्यानं एकाच जागी पुन्हा पुन्हा टोचण्याची गरज नाही. एकाच जागी पुन्हा पुन्हा इंजेक्शन घेतल्यानं त्या जागेची चरबी झडण्याचा किंवा त्या जागेला कायमची सूज येण्याचा (हायपरट्रॉफी) धोका असतो. अशा जागी इंजेक्शन दिल्यास ते नीट शोषलं जात नाही. डोस कमी पडतो. म्हणून इंजेक्शनची जागा सतत बदलती ठेवावी.
इन्शुलीन फ्रिजमध्येच ठेवावं लागतं का?
इन्शुलीनवर थेट सूर्यप्रकाश पडला तर ते कुचकामी होतं. पण सामान्य तापमानाला ते थंड ठिकाणी, आचेपासून दूर ठेवलं तर ते फ्रिजविना महिनाभर टिकू शकतं. आता इन्शुलीनची पेनं मिळतात. ती अधिक काळ सामान्य तापमानाला टिकतात. प्रवासात असताना, विशेषत: गाडीनं जाताना ते गरम होणार नाही याची काळजी घ्या. एकच गोष्ट लक्षात असू द्या. इन्शुलीनच्या बाटलीत तुम्हाला कण दिसले तर ती बाटली फेकून द्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा