काय काळजी घेतली म्हणजे मधुमेह होणारच नाही, या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड असले तरी रोजच्या आहारातील फळे आणि भाज्या आपल्याला मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात हे सिद्ध झाले आहे. अटलांटामधील ‘सेंटर फॉर डायबेटिस कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंन्शन’ या संस्थेच्या संशोधकांनी तब्बल वीस वर्षांच्या अभ्यासानंतर काढलेला हा निष्कर्ष आहे. फळे आणि भाज्यांचा योग्य समावेश असलेला संतुलित आहार मधुमेह होणे टाळण्यासाठी फायदेशीर ठरतो. विशेषत: मोठय़ा माणसांमध्ये आणि त्यातही स्त्रियांमध्ये असा आहार मधुमेह होण्याचा धोका कमी करतो, असे या संशोधकांनी म्हटले आहे. ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

मटण आणि चीजसारखे पदार्थ प्रमाणातच खा – मटण आणि चीजसारखे प्राणिजन्य पदार्थ सातत्याने आणि अतिप्रमाणात खाल्ल्यास ‘टाईप २’ मधुमेह होण्याचा धोका वाढतो, असे पॅरिसमध्ये झालेल्या एका अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे मधुमेह होणे टाळण्यासाठी अशा पदार्थाचे अतिसेवन टाळलेलेच बरे.

Story img Loader