साखर हा मानवी आहाराचा पुरातन काळापासून घटक राहिला आहे. भारत आणि चीनमध्ये सर्वात आधी आहारात साखर वापरली गेली, असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. मात्र गेल्या काही दशकांपासून साखरेपासून दूर राहण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. साखरेचे खाणार त्याला दात खराब होण्यापासून लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, यकृतविकार, काही कर्करोग यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. 

आपल्या सर्वानाच माहीत आहे की, जेवण हे कबरेदकांनी – साखर, स्निग्धांश, प्रथिने, धातू, प्रथिने आणि पाण्याने तयार झालेले असून पोषण होण्यासाठी किंवा आवड म्हणून जेवल्यावर आपले शरीर या अन्नाचे पचन करून उर्जेत रुपांतर करते. कोलेस्टेरॉल, मीठ, साखर तसेच स्निग्ध घटकांचे प्रमाण मर्यादित ठेवून सर्व आवश्यक पोषकतत्त्व पुरवणाऱ्या आहाराला सकस म्हटले जाते.
अनेक देशांमध्ये जेवण घेण्याची पारंपरिक पद्धत असते, जेवणाचे विशिष्ट पदार्थ, ते तयार करण्याची, तसेच जेवण्याची रीत असते. अपुऱ्या पोषणामुळे होत असलेल्या सामान्य आजारांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक देशाकडूनही हवामान, सवयी, पोषक तत्त्वे यांचा मेळ घालून सकस आहार ठरवला जातो. भारतीय कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि आकडी नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत (एनपीसीडीसीएस) सकस आहार, खेळ आणि व्यायामातून शारीरिक हालचाल, तंबाखू तसेच मद्य टाळणे आणि तणावाचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. जेवणात कमी मीठ तसेच फास्ट फूडच्या अतिरेकाला पायबंद घालण्यासाठी आपल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात प्राधान्य देण्यात आले असले, तरी केवळ मधुमेहासाठीच आहारात कमी साखरेचा सल्ला देण्यात आला आहे.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

साखर खरेच गोड विष आहे?
रिफाइंड साखरेचे उच्च प्रमाण असलेला आहार हा मानवी आरोग्यासाठी कितपत धोकादायक आहे, त्यावर गेली वीस वर्षे वाद होत आहेत. एवढेच नव्हे तर तंबाखू किंवा दारू प्रमाणे साखरेचेही व्यसन लागू शकते, असा काहींचा दावा आहे. इंग्लंडमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणासाठी तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी साखरेला जबाबदार धरले आहे. नागरिकांच्या आहारातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तंबाखू आणि दारूप्रमाणे साखरेवरही कर लावण्याची मागणी या डॉक्टरांनी केली.
लठ्ठपणाची समस्या काही केवळ इंग्लंडपुरती मर्यादित राहिलेली नाही. जगभरात वाढत असलेल्याया समस्येवर जागतिक आरोग्य परिषदेमध्येही दहा वर्षांहून अधिक काळ चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता परिषदेने साखरेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी जनमत मागविले आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या वेबसाइटवर ही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली असून, ३१ मार्चपर्यंत त्यावर मते देता येतील. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लठ्ठपणा रोखण्यासाठी आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परिषदेच्या सध्याच्या (२००२ पासून) शिफारशीनुसार आहारातील एकूण कॅलरीपैकी (दोन हजार किलो कॅलरी) साखरेचे प्रमाण हे दहा टक्क्य़ांपेक्षा कमी असावे. याचाच अर्थ दिवसाला ५० ते ७० ग्रॅम (१२ ते १६ लहान चमचे) साखरेचे प्रमाण योग्य ठरते. नव्या शिफारशींनुसार हे प्रमाण दहा टक्क्य़ांपेक्षा कमी असावे, मात्र ते पाच टक्क्य़ांपेक्षा कमी असल्यास अधिक उपकारक ठरेल, असे म्हटले आहे. यानुसार उंचीच्या प्रमाणात योग्य वजन असलेल्या प्रौढांना दिवसाला आहारातून २५ ग्रॅम (सहा लहान चमचे) साखर योग्य ठरू शकेल. या साखरेच्या प्रमाणात जेवण तयार करताना किंवा तयार जेवणात असलेली ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज किंवा नेहमीची साखर तसेच मध, गूळ, फळांचे रस यांच्यात नैसर्गिकरित्या असलेली शर्करा यांचा समावेश आहे. मात्र संपूर्ण फळात असलेल्या साखरेचा या २५ ग्रॅममध्ये समावेश नाही. फळामध्ये असलेल्या साखरेचा शरिराला अपाय करणाऱ्या घटकांमध्ये समावेश होत नाही, कारण फळात असलेले तंतू ही साखर शरिरात विरघळवण्याचा वेग कमी करतात.

भारतीय आहारातील साखरेचे प्रमाण
भारतीय दरवर्षी २६,५०० मेट्रीक टन साखर रिचवतात. पारंपरिक भारतीय जेवणात भात, वरण, भाजी, पोळी, पापड, दही, चटणी किंवा लोणचे आणि एका गोड पदार्थाचा समावेश असतो. मांसाहारी जेवणात चिकन किंवा मटण यांचाही समावेश असतो. या जेवणात सरासरी २० ग्रॅम साखर असते. आता आपल्याला तंतूमय पदार्थाचे प्रमाण वाढवायचे असून साखरेचे प्रमाण निम्म्यावर आणायचे आहे. तयार जेवणात साखर थेट दिसत नसली तरी ती अनेक प्रकारे लपून बसलेली असते. उदारणार्थ एक चमचा केचअपमध्ये साधारण चार ग्रॅम (एक लहान चमचा) साखर असते.
इतर कबरेदकांप्रमाणेच साखर हा उर्जेचा स्रोत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच दररोजची कामे करण्यासाठी उर्जेची आवश्यकता आहे. मात्र आपल्याला लागणाऱ्या उर्जेपेक्षा जास्त कॅलरी आहारातून शरीरात गेल्यास त्या चरबीच्या माध्यमातून साठून राहणार व त्यामुळे लठ्ठपणा येणार हे साहजिकच आहे. रोजचे सर्वसाधारण काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला दोन हजार किलो कॅलरीची आवश्यकता असते, पण प्रत्यक्षात रोजच्या आहारातून यापेक्षा कितीतरी अधिक कॅलरी पोटात जातात आणि त्यामानाने आपले सध्याचे राहणीमान बैठय़ा स्वरुपाचे झाले असल्याने या कॅलरी वापरल्या जात नाहीत.
साखर हा शत्रू नाही, मात्र व्यायामाकडे पाठ फिरवल्यामुळे अतिरिक्त साखरेचा शरीरावर घातक परिणाम होत आहे. लठ्ठपणाची समस्या भारतीय शहरांमध्येही वाढत आहे.
त्यामुळे साखरेच्या या नव्या प्रमाणाकडे आपणही गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. गोड पदार्थाची आवड असलेल्यांनी तर याकडे विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे कारण साखरेचे
खाणार त्याला..

Story img Loader