दिवाळी तोंडावर आल्याने फटाक्यांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. अनेकांना मजेचे वाटणारे फटाके आरोग्यासाठी मात्र चांगले नाहीत. फटाक्यांच्या धुरामुळे होणारा श्वसनाचा त्रास, फटाक्यांनी भाजल्यामुळे होऊ शकणाऱ्या गंभीर जखमा यांचा विचार फटाके उडवताना मनात येत नाही. यात डोळ्यांना किरकोळ इजा होण्यापासून अगदी दृष्टी जाण्यापर्यंतही मजल जाऊ शकते. फटका फुटून अतिशय वेगाने डोळ्यात घुसल्यामुळे डोळा जाऊ शकतो. कानांच्या पडद्यांसाठीही आवाजी फटाके वाईटच. फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून काय आणि फटाक्यांमुळे दुर्घटना घडलीच तर काय करावे, याबाबत सांगताहेत वैद्यकीयतज्ज्ञ-

फटाक्यांनी भाजणे गंभीरच

टिकल्या उडवताना भाजणे किंवा फटाके उडवताना नुसता चटका बसणे अशा गोष्टी सोडल्या तर फटाक्यांनी भाजलेल्या जखमा सहसा ‘मायनर बर्न’मध्ये मोडत नाहीत. फटाका फुटतो तेव्हा त्या ठिकाणी ८०० डिग्री तापमान निर्माण होते. भुईनळ्यासारखे फटाके जेव्हा हातात फुटतात त्या ठिकाणची कातडी आणि आतील मांसदेखील जाळतात. त्यामुळे असे भाजणे किरकोळ नक्कीच नाही. भाजल्यावर प्रथम गार पाण्याखाली २ ते ५ मिनिटे हात धरून ठेवावा. यासाठी अगदी बर्फाचे पाणी वापरले तरी चालेल. जखम टिपून कोरडी करून त्यावर कोणतेही चांगले अँटिसेप्टिक मलम लावावे.
फटाक्याने भाजल्यावर त्यावर शाई ओतणे, टूथपेस्ट लावणे असे प्रकारही लोक करतात, परंतु ते चुकीचे असून निश्चित टाळावे. सर्वप्रथम गार पाण्याखाली भाजलेला भाग धरून ठेवणे आवश्यक. जखम टिपल्यावर लावण्याचे मलमही अँटिसेप्टिक असावे. अनेकदा रुग्णांकडून अनेक बाबींवर चालणारी ‘मल्टीपर्पज’ मलमे लावली जातात, पण तेही शक्यतो टाळावे. फटाक्याच्या जखमेला जंतूसंसर्ग लवकर होऊ शकतो. त्यामुळे प्रथमोपचार केल्यावर डॉक्टरांना दाखवायलाच हवे. फटाका फुटताना नुसती उष्णताच नव्हे तर शक्तीही बाहेर पडल्यामुळे फटाक्याने भाजण्याच्या वेळी त्वचेच्या त्या भागाला फटका बसतो आणि सूज येते. अशा रुग्णांना सूज कमी करणारी औषधे आणि प्रतिजैविके दिली जातात. मागील काही महिन्यांत रुग्णाने धनुर्वाताचे इंजेक्शन घेतलेले नसेल तर तेही दिले जाते.
फटाक्याने भाजल्यावरचे उपचार जखम पूर्ण बरी होईपर्यंत घेणे गरजेचे आहे. वरून जखम लहान दिसली आणि लगेच भरल्यासारखी वाटली तरी आत मांसल भागापर्यंत नुकसान झालेले असते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेला औषधांचा डोस पूर्ण करावा. योग्य काळजी घेतल्यास फटाक्यांची जखम ५ ते ८ दिवसांत बरी होते, परंतु जखम खोल असल्यास २ आठवडे लागू शकतात.

डोळे सांभाळा!

मोठय़ा फटाक्यांचा मोठा आवाज यावा म्हणून अनेक जण त्या शेजारी पत्र्याचा डबा ठेवतात. असा फटाका फुटतो तेव्हा बारीक ठिणग्या उडतात. अनेकदा फटाक्याची वात पेटवूनही फटाका फुटत नाही आणि कुतूहलाने जवळ गेल्यावर अचानक तो फुटतो. अशा वेळी ठिणग्या डोळ्यांत जाऊन इजा होऊ शकते. हाताने फुलबाज्या उडवतानाही लहान मुलांच्या डोळ्यात ठिणग्या जाऊ शकतात.
काही फटाक्यांमध्ये बारीक खडय़ासारखा कठीण पदार्थ असतो. फटाका खूप जवळ फुटतो तेव्हा हा कठीण पदार्थ फटकन डोळ्याला लागून डोळा चक्क फाटतो. अशा गंभीर प्रसंगी शस्त्रक्रिया हाच उपाय असू शकतो. पण ठिणगी डोळ्यात गेल्यामुळे होणाऱ्या किरकोळ इजेवर काही प्राथमिक उपाय करता येतील. फटाके उडवताना पाण्याची बादली आणि तांब्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. डोळ्याला फटाक्याने गंभीर इजा झाली नसेल, नजरेला काही झाले नसेल तेव्हा प्रथमोपचार म्हणून डोळा स्वच्छ पाण्याने धुवावा. डोळ्यात गेलेले बारीकसे कण त्याने धुवून जातात. त्यानंतर कोरडय़ा कापसाची पट्टी डोळ्यावर बँडेजने किंवा रुमालाने हलकेच बांधून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळ्याला गंभीर जखम झाली असली तर मात्र तातडीने नेत्रतज्ज्ञांकडे जाणे आवश्यक आहे. अशा वेळी डोळा पाण्याने न धुता केवळ कापसाची पट्टी ठेवून लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.
– डॉ. श्रीकांत केळकर, नेत्रतज्ज्ञ

धुराचा त्रास!

टिकल्या उडवताना भाजणे किंवा फटाके उडवताना नुसता चटका बसणे अशा गोष्टी सोडल्या तर फटाक्यांनी भाजलेल्या जखमा सहसा ‘मायनर बर्न’मध्ये मोडत नाहीत. फटाका फुटतो तेव्हा त्या ठिकाणी ८०० डिग्री तापमान निर्माण होते. भुईनळ्यासारखे फटाके जेव्हा हातात फुटतात त्या ठिकाणची कातडी आणि आतील मांसदेखील जाळतात. त्यामुळे असे भाजणे किरकोळ नक्कीच नाही. भाजल्यावर प्रथम गार पाण्याखाली २ ते ५ मिनिटे हात धरून ठेवावा. यासाठी अगदी बर्फाचे पाणी वापरले तरी चालेल. जखम टिपून कोरडी करून त्यावर कोणतेही चांगले अँटिसेप्टिक मलम लावावे.
फटाक्याने भाजल्यावर त्यावर शाई ओतणे, टूथपेस्ट लावणे असे प्रकारही लोक करतात, परंतु ते चुकीचे असून निश्चित टाळावे. सर्वप्रथम गार पाण्याखाली भाजलेला भाग धरून ठेवणे आवश्यक. जखम टिपल्यावर लावण्याचे मलमही अँटिसेप्टिक असावे. अनेकदा रुग्णांकडून अनेक बाबींवर चालणारी ‘मल्टीपर्पज’ मलमे लावली जातात, पण तेही शक्यतो टाळावे. फटाक्याच्या जखमेला जंतूसंसर्ग लवकर होऊ शकतो. त्यामुळे प्रथमोपचार केल्यावर डॉक्टरांना दाखवायलाच हवे. फटाका फुटताना नुसती उष्णताच नव्हे तर शक्तीही बाहेर पडल्यामुळे फटाक्याने भाजण्याच्या वेळी त्वचेच्या त्या भागाला फटका बसतो आणि सूज येते. अशा रुग्णांना सूज कमी करणारी औषधे आणि प्रतिजैविके दिली जातात. मागील काही महिन्यांत रुग्णाने धनुर्वाताचे इंजेक्शन घेतलेले नसेल तर तेही दिले जाते.
फटाक्याने भाजल्यावरचे उपचार जखम पूर्ण बरी होईपर्यंत घेणे गरजेचे आहे. वरून जखम लहान दिसली आणि लगेच भरल्यासारखी वाटली तरी आत मांसल भागापर्यंत नुकसान झालेले असते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेला औषधांचा डोस पूर्ण करावा. योग्य काळजी घेतल्यास फटाक्यांची जखम ५ ते ८ दिवसांत बरी होते, परंतु जखम खोल असल्यास २ आठवडे लागू शकतात.
– डॉ. अविनाश भोंडवे

Story img Loader