निरोगी त्वचा आणि केस हे चांगल्या आरोग्यांचे लक्षण आहे असे म्हटले जाते. तसेच निरोगी दात हेही माणसाच्या आरोग्याचे प्रतिक आहे. माणसाची जशी उत्क्रांती आणि प्रगती होत गेली तसा माणूस निसर्गापासून दूर होत गेला. आयुष्यमान आणि जीवनशैली बदलत गेली आणि त्याचे परिणाम माणसाच्या आरोग्यावर दिसू लागले. तसेच ते दातांवरही दिसून येऊ लागले.  
निरोगी दातांसाठी जीवनशैलीतील काही गोष्टी नियंत्रित ठेवणे फार गरजेचे असते. ‘निरोगी शरीरात निरोगी मन’ हा एकूणच निरोगी आरोग्याचा मंत्र दातांनाही लागू पडतो. अर्थातच त्यात आरोग्यदायी अन्न आणि नियमित व्यायाम आलाच! म्हणजेच फळे, भाजीपाला, भात, प्रोटीनयुक्त पदार्थ (मासे, अंडी, मांसाहार) असे सर्व घटक अन्नात योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
साखर हे दातांच्या समस्यांचे खूप मोठे कारण आहे. आपल्या शरीरात साखर वेगवेगळ्या घटकांतून जाते. चॉकलेट, आईस्क्रीम, मध, केक- पेस्ट्रीज, सॉफ्ट ड्रिंक्स, गोड सिरप, फळांचा रस अशा घटकांचे सेवन कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे. म्हणजे गोड पदार्थ खायचेच नाहीत असे नाही. फक्त त्यावर नियंत्रण मात्र हवे. ते दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
धूम्रपान हे केवळ फुफ्फुसांसाठीच नव्हे तर ते दातांच्या आरोग्यासाठीही हानीकारक असते. धूम्रपान तोंडाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरते. तसेच त्यामुळे दातांवर जाग पडतात. तर मद्यपानामुळे दातांच्या बाहेरील आवरणाचे म्हणजेच एनॅमलचे नुकसान होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते प्रदूषण आणि तणाव वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतात. मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, फुफ्फुसाचे आजार यांवरील उपचारांत रुग्णांना जी औषधे दिली जातात. त्यामुळेही दातांवर वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. तोंड कोरडे पडण्यासारख्या काही तक्रारीही या औषधांमुळे उद्भवू शकतात. रक्तदाबाच्या विकारावर जी औषधे दिली जातात त्यामुळे रुग्णाचा दात काढताना अधिक रक्तस्राव होणे, तोंडाची चव बदलणे, हिरडय़ा सुजणे, दातांचा व हिरडय़ांचा रंग बदलणे, तोंडामध्ये ‘फंगल इन्फेकशन’ म्हणजे विशिष्ट प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव होणे अशा तक्रारी दिसू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोंड आणि दातांच्या निरोगीपणासाठी काही गोष्टी अवश्य कराव्यात
*    दर सहा महिन्यांतून एकदा डॉक्टरांकडून दातांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
*    दिवसातून दोनदा ब्रश करावा.
*    साखरेच्या सेवनावर नियंत्रण हवेच.
*    तंबाखूयुक्त पदार्थापासून दूरच राहणे बरे!
*    नियमित व्यायाम व मानसिक आरोग्यासाठी प्राणायाम करणे.

मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For healthy teeth
Show comments