वयाच्या तिसऱ्या वर्षांआधीच आपण मुलगा आहे की मुलगी याची जाणीव होते. काही मुलांना त्यावेळेपासून आपल्या लिंगाबद्दल अढी वाटते. बहुतेक वेळेला ही बाब मुलांमध्ये घडते. त्याचा ठाम विश्वास असतो की तो मुलगा नाही, मुलगी आहे. मुलगा म्हणून वागवल्यावर त्याला राग येतो. त्याचे खेळ, वेष, वागणे, आवडीनिवडी सर्व मुलीसारखे असतात. काही मुलांना स्वतच्या लैंगिक अवयवाकडे पाहून किळस वाटते. मुलींप्रमाणे बसून ते लघवी करण्याचा प्रयत्न करतात. मुलाच्या वर्तणुकीवर घरच्यांकडून तीव्र प्रतिक्रिया होते. कधीकधी मुलावर शारीरिक, मानसिक दबाव आणि अत्याचार केले जातात. उपचार, पूजा, नवस केले जातात. सर्व कुटुंब त्रस्त होते. त्रास सहन होत नाही म्हणून मुलगा नमते घेऊन ही भावना मनात दडपून सामान्य जीवन जगण्याचा देखावा करतो. पण स्त्री असण्याचा विश्वास तसाच राहतो. मोठेपणी त्याची लैंगिक निवड समलंगिकतेकडे वळते. या प्रकाराला लैंगिक ओळख असे म्हणतात. ही स्थिती क्वचितच मुलींमध्ये आढळते. याचे नेमके कारण अजूनही कळलेले नाही. विशेष म्हणजे बालपणी हौस म्हणून मुलीचे कपडे घातले, मुलींचे खेळ दिले, काही बाबतीत दुर्लक्ष झाले किंवा गर्भावस्थेत विशिष्ट पदार्थ खाल्ले म्हणून असे घडत नाही. स्त्रीचे मन आणि पुरुषाचा देह किंवा पुरुषाचे मन आणि स्त्रीचा देह अशी ही परिस्थिती असते. यावर संशोधन केल्यानंतर समजले आहे कीमनाच्या ठेवणीला प्राधान्य देणे जास्त योग्य. शरीराच्या रचनेनुसार मन बदलण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होतो आणि तसे घडतही नाही. मात्र मनाच्या स्थितीला मान देऊन शरीराची रचना बदलल्यावर संबंधित व्यक्ती समाधानी जीवन जगतात. त्यामुळे त्यांचे मन बदलण्याचा उपचार केला जात नाही. छोट्या मुलाच्या अशा वागण्याच्या तक्रारी आल्या की मानसिक तपासणीतून मुलाच्या मानसिकतेची खात्री केली जाते. खात्री पटल्यावर पालकांचे समुपदेशन करून त्याच्या मनातलेच लिंग मान्य करून त्याप्रमाणे त्याचे संगोपन करण्याचा सल्ला दिला जातो. पौगंडावस्थेपासून औषध, शस्त्रक्रिया करून लिंगबदलाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा