असे का होते?
आयुर्वेदाची चिकित्सा असे सांगते की, शीतकाळात शरीरातील कफाचे प्रमाण वाढते. तो मानेच्या वरच्या भागात, नासिकेमध्ये साचून राहतो. त्याचबरोबर या काळात तिखट, रसरशीत असे पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळेही कफाची निर्मिती होते आणि साचून राहतो. तो वाहून न गेल्याने सर्दीचे रूपांतर डोकेदुखीत होते.
उपाय काय?
* सोपा उपाय म्हणजे, सकाळी उठल्यावर आणि सायंकाळी झोपताना गरम पाणी पिणे. पाण्याला उकळी आणावी. मग ते आपल्याला मानवेल असे कोमट झाले की प्यावे.
* जेवणापूर्वी अर्धे पेर आलं मीठ लावून बारीक चाऊन खावे.
यामुळे काय होते?
या उपायांमुळे साचलेला कफ वाहून जाण्यास मदत होते. तो गेल्यामुळे स्रोतस (द्रव पदार्थ वाहन नेणारा मार्ग) मोकळा होतो. कफ वाहून जायला लागला की डोकेदुखी कमी होते.
इतर काय काळजी घ्यावी?
* आहारात तीळ, गुळाचा समावेश असावा.
* तिखट बेतानेच खावे.
* दिवसातील पहिला आहार लवकर घ्यावा. तो सूर्योदयानंतर तासाभराच्या आत घ्यावा.
* या काळात घेतलेला आहार व व्यायाम वर्षभर ऊर्जा देणारा आहे. त्यामुळे व्यायाम जरूर करावा.
वैद्य विश्वास जातेगावकर