झपाटय़ाने बदललेली जीवनशैली आणि रोजच्या कामाची वाढलेली दगदग यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. जीवनशैलीशी निगडित आरोग्य समस्यांमध्ये उच्च रक्तदाब ही एक महत्त्वाची समस्या आहे. आकडेवारी पाहता गेल्या काही वर्षांत या समस्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २००० साली प्रसिद्ध झालेल्या एका वैद्यकीय अहवालानुसार देशाच्या शहरी भागातील २५ टक्के लोकसंख्येत तर ग्रामीण भागातील १० टक्के लोकसंख्येत ही समस्या आढळत असे. मात्र ताज्या पाहणीनुसार शहरी भागातील मध्यमवर्गीय व्यक्तींपैकी ३२ टक्के पुरूषांना तर ३० टक्के महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. उच्च रक्तदाबाची पूर्व स्थिती अनुभवणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. शहरांतील मध्यमवर्गीय लोकसंख्येपैकी ४० टक्के पुरूष आणि ३० टक्के महिला उच्च रक्तदाब पूर्व स्थितीत असल्याचे आढळले आहे.
मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. संतोषकुमार डोरा म्हणाले, ‘‘९५ टक्के रुग्णांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब हा प्राथमिक स्थितीतील असतो. मेंदू, हृदय, मूत्रपिंड, डोळे या अवयवांवर उच्च रक्तदाबामुळे परिणाम होऊ शकतो. रक्तदाबाच्या या समस्येमागे असलेल्या रुग्णाचे वय आणि आनुवंशिकता या कारणांचा प्रतिबंध करणे आपल्या हातात नाही. मात्र उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणारे धूम्रपान, मद्यपान, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण- तणाव हे घटक आपल्याच हातात आहेत.’’

प्रतिबंधासाठी काय करावे
* रोज नियमित शारिरिक व्यायाम आवश्यक. यात वेगाने चालणे, जॉगिंग करणे असे व्यायाम करता येतील. इतर काही आजार असलेल्यांनी आणि गरोदर स्त्रियांनी व्यायामापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.
* आपला ‘बॉडी मास इंडेक्स’ म्हणजेच उंची आणि वजन यांचे गुणोत्तर प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.
* रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण अधिक नसावे. जेवताना वरून मीठ घेणे शक्यतो टाळावेच.   
* रोजच्या आहारात चरबीयुक्त घटक कमी आणि तंतुमय घटक अधिक असणे आवश्यक आहे. यासाठी तळलेले पदार्थ आणि फास्ट फूडचा मोह आवरा, आणि जेवणात सॅलड नियमित असू द्या!
* धूम्रपान, मद्यपान आणि कोणतेही व्यसन अर्थातच टाळावे!

Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…