झपाटय़ाने बदललेली जीवनशैली आणि रोजच्या कामाची वाढलेली दगदग यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर दिसतो. जीवनशैलीशी निगडित आरोग्य समस्यांमध्ये उच्च रक्तदाब ही एक महत्त्वाची समस्या आहे. आकडेवारी पाहता गेल्या काही वर्षांत या समस्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २००० साली प्रसिद्ध झालेल्या एका वैद्यकीय अहवालानुसार देशाच्या शहरी भागातील २५ टक्के लोकसंख्येत तर ग्रामीण भागातील १० टक्के लोकसंख्येत ही समस्या आढळत असे. मात्र ताज्या पाहणीनुसार शहरी भागातील मध्यमवर्गीय व्यक्तींपैकी ३२ टक्के पुरूषांना तर ३० टक्के महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. उच्च रक्तदाबाची पूर्व स्थिती अनुभवणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. शहरांतील मध्यमवर्गीय लोकसंख्येपैकी ४० टक्के पुरूष आणि ३० टक्के महिला उच्च रक्तदाब पूर्व स्थितीत असल्याचे आढळले आहे.
मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. संतोषकुमार डोरा म्हणाले, ‘‘९५ टक्के रुग्णांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब हा प्राथमिक स्थितीतील असतो. मेंदू, हृदय, मूत्रपिंड, डोळे या अवयवांवर उच्च रक्तदाबामुळे परिणाम होऊ शकतो. रक्तदाबाच्या या समस्येमागे असलेल्या रुग्णाचे वय आणि आनुवंशिकता या कारणांचा प्रतिबंध करणे आपल्या हातात नाही. मात्र उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरणारे धूम्रपान, मद्यपान, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण- तणाव हे घटक आपल्याच हातात आहेत.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा