मुंबईसारख्या शहरात आत्महत्येच्या घटना रोज घडत असतात. मात्र गेल्या आठवडय़ात तब्बल सहा आत्महत्या झाल्या असून हे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. आत्महत्या हे टोकाचे उदाहरण झाले. मात्र शहरात एकूणच नराश्याचे प्रमाण वाढते, हे अनेक चाचण्यांमधून समोर आले आहे.
अगदी रोजचेच उदाहरण. सकाळी वेळेत कार्यालयात पोहोचणे. पण त्यासाठी सकाळी वेळेत उठायचे, तयारी करायची, महिला असेल तर घरातील कामे, जेवण, डबे आटोपायचे, वेळेत घराबाहेर पडायचे, स्टेशनला जाणारी बस, रिक्षा गाठायची, त्यासाठी सुटे पसे ठेवायचे किंवा वाद घालण्याची तयारी ठेवायची, रोजची ट्रेन मिळवण्यासाठी धावायचे, गर्दी असेल आणखी ताण.. अपेक्षित स्टेशनवर उतरायला आधीपासूनच तयारीत राहायचे, आणि मग पुन्हा स्टेशनपासून कार्यालयाच्या दिशेने जीव तोडून धावायचे. या मधल्या काळात घर आणि कार्यालयातील दिवसभराच्या कामांची यादीही मनात योजायची.. बहुसंख्य नागरिकांची रोजची सुरुवात जर अशा ताणाने होत असेल तर शहरातील नराश्य अधिक असल्यास आश्चर्य वाटायला नको.
मुंबईसारख्या शहरात आत्महत्येच्या घटना रोज घडत असतात. मात्र गेल्या आठवडय़ात दोन दिवसांतच सहा आत्महत्यांच्या वृत्ताने खळबळ उडाली. आत्महत्या हे टोकाचे उदाहरण झाले, मात्र शहरात एकूणच नराश्याचे प्रमाण वाढते, हे अनेक चाचण्यांमधून समोर आले आहे. भौतिक सुखासाठी शहराची वाट धरलेल्या अनेकांना घडय़ाळाच्या काटय़ावर धावणारे शहर, कामाचे १२-१४ तास, प्रवासाचे तीन ते चार तास, गर्दी, कोलाहल आणि एकूणच गुंतागुंतीची जीवनशैली झेपत नाही. त्यातच तणाव घालवण्यासाठी निवांत क्षण आणि शांत वातावरणाची वानवा, त्यामुळे ताण वाढतो आणि लहानसहान घटनांमधून नराश्य वाढत जाते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार सर्वात अधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा आजारांमध्ये चार मानसिक विकार आहेत. त्यात नराश्य हे पहिल्या क्रमांकावर आहे. गावाकडच्या आयुष्याच्या तुलनेत शहरातील जीवनशैली अधिक गुंतागुंतीची आहे. आयुष्य हे प्राधान्य आणि उपजीविका हे माध्यम असायला हवे. मात्र शहरात उपजीविकाच प्राधान्यक्रमावर असते. त्यासाठी वाढलेली गर्दी, वाहतूक, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा यांना रोज तोंड द्यावे लागते. साहजिकच ताण व त्यातून नराश्य वाढते.
शहरात गर्दी खूप असली तरी माणूस एकटा असतो. भरगर्दीतही हा एकटेपणा जाणवतो. त्यातही प्रत्येकाची दिनचर्या ठरलेली असल्याने वृद्ध व लहान मुले घरी एकटी पडतात. शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी संवाद कमी होतो. मनातील साचलेल्या दु:खाला ऑनलाइन चॅटिंगद्वारे नीट वाट करून देता येत नाही. आणि लाइक्स, रिप्लायमुळे ते कमी होत नाही, त्यामुळे नराश्याचे प्रमाण वाढते, असे समुपदेशक डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले. ऑनलाइन गप्पांचे प्रमाण वाढले असले तरी ते बेगडी आहे, त्यातील वाहवामुळे आयुष्यात फारसा फरक पडत नाही, हे मनात कुठे तरी माहीत असते. मात्र तरीही तटस्थपणे बसून रोजच्या घटनांचा विचार करण्याऐवजी मन गुंतवण्याचा हा रेडिमेड पर्याय तरुणांना जास्त हवाहवासा वाटतो. त्यातच नाही ऐकण्याची सवय नसलेली लहान मुलांची पिढी आता मोठी झाली आहे. त्यामुळे शांत राहून वाट पाहण्याची सवयच कमी आहे. त्यामुळेही नराश्यात भर पडते. पण नराश्य वाढवणाऱ्या घटना आहेत, तसेच त्या कमी करणारेही पर्याय आहेत. स्वत:साठी वेळ काढणे आणि आयुष्याबाबत तटस्थपणे विचार करणे हे सर्वात महत्त्वाचे. मित्रमत्रिणीशी संवाद साधणे हादेखील एक पर्याय आहे. रोजच्या रोज मनातील वाईट घटनांचा गाळ काढून टाकला तर ताणाचे व त्यातून येणाऱ्या निराशेचेही परिणाम कमी होत जातील, असे डॉ. बर्वे यांनी सांगितले.
भविष्य घडवण्याची जिद्द घेऊन करिअरमागे लागलेली तरुण पिढी ही या नराश्याची हमखास बळी ठरते. जीवनातील सुखासाठी केलेले लग्नही मग अनेकांचा जाचक वाटू शकते. लग्न वाचवण्याचा शेवटचा पर्याय म्हणून विवाह समुपदेशकांकडे पोहोचणाऱ्या अनेक जोडप्यांमधील बेबनावाला शहरी आयुष्यातील तणावही कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. कार्यालयात १२ तास काम असले तरी वाहतूक, तयारीचा वेळ लक्षात घेता दिवसाचे १६ तास त्यात जातात. रात्री आठ-साडेआठ वाजता घरी आल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही थकलेले असते. अशा वेळी एकमेकांशी गप्पा मारण्याचा उत्साहही राहत नाही. मग आरामासाठी आणि ताण निवळण्यासाठी टीव्ही, खेळ, पुस्तके यांचा आसरा घेतला जातो. रोजची कटकट नकोशी वाटते, असे समुपदेशक गौरी कोठारी म्हणाल्या. एकमेकांसाठी वेळ द्यावा ही मूलभूत बाब असली तरी रोजच्या धकाधकीत तो देता येत नाही. मग कार्यालयात ताण वाढला की त्यात घरातल्या नराश्याची भर पडत जाते. यासाठी वेळेचे व्यवस्थापन करून एकमेकांना आनंद वाटेल असा संवाद साधायला हवा. रोज जेवताना टीव्ही बंद करून एकमेकांशी संवाद साधला तरी फरक पडेल, असे त्यांनी सांगितले.
ताण-तणाव हा रोजच्या आयुष्याचा भाग आहे. दु:ख नसेल तर आनंदाचा आस्वादही घेता येणार नाही. फक्त हे दु:ख मनाला किती लावून घ्यायचे याचा तारतम्याने विचार करायला हवा आणि त्यासाठी स्वत:साठी दिवसातील काही मिनिटे राखून ठेवायला हवीत.
शहरातील नैराश्यास कारण की..
मुंबईसारख्या शहरात आत्महत्येच्या घटना रोज घडत असतात. मात्र गेल्या आठवडय़ात तब्बल सहा आत्महत्या झाल्या असून हे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. आत्महत्या हे टोकाचे उदाहरण झाले. मात्र शहरात एकूणच नराश्याचे प्रमाण वाढते, हे अनेक चाचण्यांमधून समोर आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-09-2014 at 06:26 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing depression in cities