एका ज्येष्ठ व वृद्ध गायिकेच्या मुलीचा फोन होता. आई मानसिकिरत्या सामान्य असल्याचे प्रमाणपत्र मागण्यासाठी. तिच्या गाण्यांचे रेकॉìडग परदेशात प्रकाशित करण्याचे हक्क संगीत कंपनीला विकण्यासाठी या प्रमाणपत्राची गरज होती. आई बहिणीकडे राहते आणि बहिणीला हे काही पटत नाही. त्यामुळे तुम्हीही बहिणीला सांगू नका आणि मी आईलाही सोबत आणू शकत नाही. हे ऐकल्यावर मला संशय आला. पुढे प्रमाणपत्र देण्याची वेळ माझ्यावर आली नाही. मात्र एका हुशार, श्रीमंत गायिकेचीही म्हातारपणी फसवणूक होऊ शकते हे लक्षात घेण्यासारखे आहे. चोरी व इतर गुन्ह्यांविषयी आपण उघडपणे बोलू तरी शकतो. गरवर्तन (अब्युज) ओळखणे व मान्य करणे कठीण असल्याने त्यावर उपाय करण्यात उशीर होतो व कठीणही ठरतो.
कायद्यानुसार आई-वडिलांची काळजी घेणे, त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे ही मुलांची जबाबदारी आहे. ज्येष्ठांना त्यांच्या गतीप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य, तब्येतीला योग्य असा आहार, आराम करण्यासाठी शांत जागा, आरोग्यासाठी औषधोपचार व सोबत लागते. काही कुटुंबात मुले आई-बाबाच्या केवळ गरजा पुरवतात पण त्यांचा आपलेपणाने आणि मानाने सांभाळ करत नाहीत. जाता- येता टाकून बोलणे, खूप जोरात ओरडून बोलणे, भांडण काढणे, आई-बाबांना इतर भावंडांशी बोलू-भेटू न देणे, सतत अपमान करणे असे वागतात. किंवा आई-बाबा माणूस नाही एखादे निर्जीव वस्तू असल्यासारखे- म्हणजे बोलायचेच नाही, कुटुंबातील महत्त्वाच्या घडामोडी न सांगणे, त्यांच्या आवडी-निवडींचा अजिबात विचार न करणे, त्यांना न विचारता त्यांचे निर्णय घेणे, घरात त्यांच्यासाठी थोडासाही वेळ न काढणे आणि अविश्वास दाखवणे असे करतात. या वागणुकीने ज्येष्ठांना दुख होते, भीती निर्माण होते आणि ते अस्वस्थ होतात. हे त्यांच्याशी होणारे भावनिक गरवर्तन आहे.
कधी-कधी त्यांना मारहाणही केली जाते. वृद्ध माणसांशी त्यांच्या मनाविरुद्ध लंगिक विषयवार बोलणे, तशी चित्र दाखवने, नग्न अवस्थेत त्यांच्याकडे बघणे- स्वत त्यांच्यासमोर जाणे आणि त्यांना स्पर्श करणे किंवा बळजबरीने लंगिक व्यवहार करणे असे लंगिक शोषण त्यांना क्वचित पण सहन करावे लागते.
ज्येष्ठ नागरिकांचा विसराळूपणा, साधेपणा व परवलंबनाचा गरफायदा घेऊन त्यांचे पसे, संपत्ती व इतर ठेवीची चोरी करण्याचा काही लोक प्रयत्न करतात. आपण त्यांना काही द्यायचे नाही, त्यांच्याच पशावर राहायचे आणि त्यांना त्रास द्यायचे असेही होते. हे सर्व त्यांचे आíथक शोषण आहे.
आपली संस्कृती बदलत असल्यामुळे, पूर्वीसारखे जेष्ठांना मान- सम्मान मिळणे कठीण झाले आहे. त्यातून कुटुंब लहान झाले, मुले परदेशी गेलेत आणि वृद्धांना एकटेच राहायला जास्त आवडते- म्हणून त्यांचे आधार कमी झाले आहेत. महागाई, ताण- तणाव, मानसिक आजार आणि सोबत द्यायला- काळजी घ्यायला माणसे मिळत नाहीत. या सर्व गोष्टीमुळे ज्येष्ठांच्या शोषणाचे प्रमाण वाढत चालेले आहे.
काही असो ज्येष्ठांचे शोषण या बाबीबद्दल ज्येष्ठांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व समाजाला जागरूक राहिले पाहिजे. एकटे राहणारे वृद्ध, संस्थेत राहणारे यांच्याकडे त्यांच्या कुटुंबीय बारीक लक्ष ठेवले पाहिजे. वृद्ध जर अस्वच्छ, कुपोषित, उदास असतील किंवा नेहमी आजारी पडत असतील, अंगावर जखमा असतील तर शोषणाची शक्यता असते, ते तपासून पाहावे. वृद्धांनी कुठल्याही प्रकारचे गरवर्तणूक सहन करायचे नाही असे ठरवले पाहिजे. गरवर्तणूक करणाऱ्याला काढून टाकणेच योग्य. कुटुंबातील व्यक्ती असेल तर तिला समजावणे, बजावणे महत्त्वाचे. नाहीतर त्यांच्यापासून दूर जाणेच योग्य. यासाठी इतर नातेवाईक, मित्र- शेजाऱ्यांची मदत घेतली पाहिजे. वेळ आल्यास पोलिसांचीसुद्धा मदत घ्या. कधी-कधी वृद्धांचे खूप करून-करून थकवा येतो, त्याच्यामुळे चांगल्या प्रेमळ माणसांकडूनही गरवर्तन घडू शकते. ‘रागाच्या भरात आई-बाबांशी गरव्यवहार केला’ असे कुणाला वाटत असेल तर ते मान्य करा आणि ते वर्तन बदलण्याचा प्रयत्न करा. गरज पडल्यास सामुपदेशकाची मदत घ्या. ज्येष्ठांशी गरवर्तणूक हा सामाजिक प्रश्न आहे. ते कमी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर सतत प्रयत्न केलेच पाहिजेत.
वृद्धांनो, सुरक्षित राहा!
ज्येष्ठ नागरिकांशी भावनिक, शारीरिक, आर्थिक आणि लंगिक गरवर्तन झालेले आढळते. भावनिक आणि आíथक शोषण जास्त आणि शारीरिक, लंगिक शोषण कमी प्रमाणात दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-03-2014 at 02:30 IST
मराठीतील सर्व Health इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Older persons remain to stay safe