उच्च रक्तदाबाचा मुकाबला करण्यासाठी पेपर क्लिप प्रत्यारोपणाचे तंत्र वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. या प्रत्यारोपण यंत्राला आरओएक्स कप्लर असे म्हणतात. रेझिस्टंट हाय ब्लड प्रेशर हा रक्तदाबाचा असा प्रकार असतो ज्यात प्रभावी औषधे घेऊनही रक्तदाब कमी होत नाही. आरओएक्स कप्लर हा निटीनॉल पासून तयार केलेला धातूचा स्टेंट बसवला जातो. तो बसवल्यानंतर पेपर क्लिप सारखा काम करतो त्यामुळे धमनी व नीला या दोन्ही रक्तवाहिन्या जांघेच्या ठिकाणी एकत्र धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रक्त जास्त रक्तदाब असलेल्या धमनीकडून कमी दाब असलेल्या नीलेकडे वाहू लागते. कपलर बसवताना अ‍ॅनेस्थेशियाचा वापर करतात. लिसेस्टरशायर येथील ग्लेनफील्ड हॉस्पिटल येथे या कपलरचा वापर एका शस्त्रक्रियेत करण्यात आला. ५६ वर्षांच्या पुरुषावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा रक्तदाब लगेच कमी झाल्याचे दिसून आले असे डॉ. आंद्रे यांनी सांगितले.

Story img Loader