ध्रूम्रपानामुळे किशोरवयीन मुलांमध्ये मूत्रपिंडाचे रोग होतात असे एका संशोधनात दिसून आले आहे. धूम्रपानामुळे या मुलांमध्ये सुरूवातीपासूनच परिणाम दिसून येतो. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेच्या अ‍ॅना नॅवस – एसियन यांनी सांगितले की, थेट धूम्रपान व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचे सानिध्य यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. या संशोधनात सहभागी झालेले तरुण दिवसातून एकदा धूम्रपान करणारे होते. त्यांच्यात सेरम कोटिनिनचे प्रमाण १० नॅनोग्रॅम/ मि.लि इतके आढळून आले. हे संशोधन जर्नल पेडियाट्रिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.