साडेसहा महिन्यांच्या चिमुकल्या शिल्पाला १९९६ मध्ये तिचे आई-बाबा आमच्या रुग्णालयात घेऊन आले तेव्हा  पंधरा दिवसांपूर्वीच तिचे हाबडोमायोसार्कोमा या प्रकारच्या कॅन्सरचे शस्त्रकर्म झाले होते. सहाव्या महिन्यात तिच्या आईला उजव्या जांघेत गाठ जाणवल्याने डॉक्टरांनी लगेचच सी.टी. स्कॅन करून शस्त्रकर्म केले. मात्र कॅन्सरची गाठ पोटातील नाजूक अवयवांनाही चिकटलेली असल्याने पूर्णपणे काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे केमोथेरॅपी घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र शिल्पाच्या आई-वडिलांनी त्या चिमुकल्या जिवाला केमोथेरॅपी देण्याऐवजी आयुर्वेदिक चिकित्सा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिल्पाच्या जन्मापासूनच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती घेतली असता वरचेवर सर्दी खोकला, ताप येण्याची, जुलाब होण्याची सवय यांचा विचार करून औषधे सुरू करण्यापूर्वी कृमिघ्न बस्ति दिले. आश्चर्य म्हणजे पहिल्या बस्तिनंतर लगेचच कृमिपतन झाले व शिल्पाची भूक, पचन, सर्दी-खोकल्याची सवय व वजन यात लक्षणीय सुधारणा होऊ लागली. तीन वष्रे नियमित आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर सी. टी. स्कॅन पूर्णत: नॉर्मल आला. आज शिल्पा कॉलजेमध्ये शिक्षण घेत असून पूर्णत: निरामय आयुष्य जगत आहे.
ल्ल आपल्या शरीरातील मांसपेशी, मेद, रक्तवाहिन्या, वातवाही नाडय़ा, कंडरा व अस्थिसंधीची आवरणे हे मृदू  घटक शरीरातील अवयवांना जोडणे, आधार देणे व  आवृत्त करणे ही कर्मे करतात. या मृदू घटकांत निर्माण  होणाऱ्या कॅन्सरला सॉफ्ट टिशू सार्कोमा असे म्हणतात. यापकी ज्या मृदू घटकांचा कॅन्सर होतो त्यानुसार सार्कोमाचे विविध प्रकार आढळतात. पृष्ठवंशाच्या  मांसपेशींत निर्माण होणारा हाबडोमायोसार्कोमा हा कॅन्सर  बालकांत आढळतो. तर अन्य प्रकारचे सार्कोमा साधारण  वयाच्या पन्नाशीनंतर निर्माण होतात. लियोमायोसार्कोमा हा मृदू मांसपेशींत निर्माण होणारा सार्केमा सामान्यत: गर्भाशय  व  पचनसंस्थेच्या अवयवांत आढळतो, तर हिमँजियोसार्कोमा रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो. कापोसीज सार्कोमा हा प्रामुख्याने एच.आय.व्ही. एड्सबाधित रुग्णांत म्हणजेच ज्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी झाली आहे अशा रुग्णांत होतो. शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी व वरचेवर होणारा जंतुसंसर्ग यामुळे वारंवार लसिकाग्रंथीचा क्षोभ होण्याची सवय असलेल्या रुग्णांत लिम्फ्लँजियोसार्कोमा या  प्रकारचा कॅन्सर होण्याची संभावना असते. प्रामुख्याने गुडघा व घोटय़ाच्या सांध्याच्या आवरणात सायनोव्हियल सार्कोमा या प्रकारचा कॅन्सर होतो. याशिवाय वातवाही नाडय़ांमध्ये निर्माण होणारा न्यूरोफायब्रोसार्कोमा, फॅट  किंवा मेदात निर्माण होणारा लायपोसार्कोमा, फायफ्रस टिशूमध्ये फायब्रोसार्कोमा असेही सार्कोमाचे प्रमुख प्रकार आहेत.
ल्ल आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार व्हिनाईल क्लोराईड,  डायॉक्सिन यासारख्या केमिकल्सशी दीर्घकाळ संपर्क, आनुवंशिकता, एड्ससारख्या आजारांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असणे, अन्य प्रकारच्या कॅन्सरसाठी  रेडिओथेरॅपी चिकित्सा घेतलेली असणे ही सार्कोमाची संभाव्य कारणे आहेत. आयुर्वेदानुसार रक्तज-मांसज व मेदोज दुष्ट ग्रंथी व अर्बुदाशी सार्कोमाचे साधम्र्य आढळते व आयुर्वेदीय संहितांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मिठाई-पेढे-बर्फी-श्रीखंड-दही असा गोड आंबट चवीचा व पचण्यास जड आहार, मांसाहार अधिक प्रमाणात व वारंवार सेवन  करणे, दुपारी जेवणांनतर झोपण्याची सवय, व्यायाम न करणे, कृमी होण्याची सवय, शरीराच्या त्या भागास मार लागणे अशा संभाव्य कारणांचा इतिहास सार्केमाच्या अनेक रुग्णांत आढळून येतो.
बऱ्याच रुग्णांत सुरुवातीच्या काळात सार्कोमाची लक्षणे  व्यक्त होत नसल्याने व्याधी बळावल्यावरच त्याचे निदान होते. ज्या अवयवात सार्कोमा होतो त्या अवयवानुसार त्याची लक्षणे दिसतात. जसे लियोमायोसार्कोमा गर्भाशयात निर्माण झाल्यास योनिगत रक्तस्राव, जठरात गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्ट्रोमल टय़ुमर निर्माण झाल्यास भूक मंदावणे, उलटय़ा, पोटदुखी ही लक्षणे दिसतात. हात, पाय किंवा कंबरेच्या खालच्या भागातील सार्कोमाचे निदान  स्थानिक सूज, गाठ व वेदना या लक्षणांनी होते. सार्कोमा या प्रकारच्या कॅन्सरचा फुप्फुसात प्रसर होण्याची शक्यता अधिक असल्याने खोकला, दम लागणे ही लक्षणेही अशा  रुग्णांत दिसतात. आधुनिक वैद्यकशास्त्रात सार्कोमाचे किंवा त्यासह त्याने व्याप्त अवयवाचे शस्त्रकर्माने निर्हरण, रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपी या उपलब्ध चिकित्सा आहेत.
ल्ल आयुर्वेदीय ग्रंथकारांनी या प्रकारच्या कॅन्सरमध्ये शस्त्रकर्म, क्षारकर्म व अग्निकर्म या प्रधान चिकित्सा सांगितल्या असून रक्तधातूची शुद्धी करणारी, विकृत मांस व मेदाचे लेखन करणारी, मांस मेद धातूंचे अग्नी प्राकृत  करणारी चिकित्सा यात लाभदायी ठरते. यासाठी त्रिफळा गुग्गुळ, कांचनार गुग्गुळ असे विविध प्रकारचे गुग्गुळकल्प, शिलाजित, वंग भस्म, प्रवाळ भस्म, आरोग्यवíधनी, कुमारी आसव, दशमूलारिष्ट उपयुक्त ठरतात. पंचकर्मापकी मांस-मेदाच्या अनियमित व विकृत वाढीवर नियंत्रण ठेवणारी बस्ति चिकित्सा व दुष्ट रक्ताचे निर्हरण करणारी रक्तमोक्षण चिकित्सा उपयुक्त ठरते. याशिवाय स्थानिक सूज, वेदना यांची तीव्रता कमी करणारे लेप, परिषेक, धारा (औषधी काढय़ांची धारा), उपनाह (पोटीस) हे उपक्रमही लाभदायक ठरतात. बऱ्याच प्रकारच्या सार्कोमामध्ये चिकित्सा केल्यावरही वारंवार पुनरुद्भव होण्याची प्रवृत्ती असल्याने दीर्घकाळ नेटाने शमन चिकित्सा, रुग्णाचे शरीरबल चांगले असल्यास वारंवार बस्ति व रक्तमोक्षण हे शोधन पंचकर्म उपक्रम तसेच पचण्यास हलका परंतु पोषक आहार असे काटेकोर पथ्यपालन यांचे आचरण हितावह !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा