उत्तम आरोग्य राखण्यासाठी महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांसाठी आहारविषयक काही टिप्स..
दही
दही खाल्ल्यावर किंवा ताक प्यायल्यावर पोट शांत झाल्याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. दिवसभरात एक किंवा दोन लहान वाटय़ा दही खाल्ले तरी चालते. हे दही ताजे आणि कमी स्निग्धांश असलेले असावे. त्यात ताज्या फळांचे तुकडे घालून खाल्ले तर आणखी चवदार लागेल. दह्य़ात बी- काँप्लेक्स जीवनसत्त्वे, पचनासाठी फायदेशीर ठरणारे ‘प्रोबायोटिक’ घटक, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रथिने, झिंक आणि रायबोफ्लेविन असते. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिमची मदत होते. तर बी- १२ जीवनसत्त्वे मेंदू तल्लख ठेवण्याबरोबरच पचनशक्ती व शरीराची प्रतिकारशक्तीही वाढवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कडधान्ये
राजमा, हरभरे आणि काबुली चण्यांमध्ये लोह भरपूर असते. त्यामुळे ही कडधान्ये ‘अॅनिमिया’ (पंडुरोग) टाळण्यासाठी फायदेशीर ठरतात. कडधान्यांना मोड आणण्याच्या प्रक्रियेत त्यांचे ‘प्रोबायोटिक’ गुणही वाढतात. जेवणात अर्धी किंवा एक वाटी कडधान्यांचा समावेश असला तरी चालेल. ही कडधान्ये मोड आलेली, थोडीशी शिजवलेली असावीत. कडधान्ये नुसती खायची नसतील तर त्यांनी उसळ किंवा आमटीही जेवणात घेता येईल. शिजवलेल्या काबुली चण्यांपासून बनवल्या जाणाऱ्या ‘हामुस’ नावाच्या चटणीसारख्या पदार्थाचाही जेवणात समावेश करता येईल. 

सुकामेवा
काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता असा बियांच्या स्वरूपात मोडणारा सुकामेवा दररोज अल्प प्रमाणात आहारात ठेवल्यास शरीरासाठी ते नक्कीच फायद्याचे. हा सुकामेवा खारवलेला किंवा न खारवलेला, भाजलेला किंवा न भाजलेला असा कशाही रूपात खाल्ला तरी चालतो. पण त्याचे प्रमाण ‘अल्प’च असावे हे ध्यानात असू द्यावे! सुक्यामेव्यात अल्फा लिनोलेनिक अॅसिड, प्रथिने, मॅग्नेशियम, ‘ब’ जीवनसत्त्व, ‘ई’ जीवनसत्त्व तसेच सेलेनियम आणि झिंकसारखी अँटिऑक्सिडंट खनिजे असतात. मासिक पाळी सुरू होण्याआधी महिलांना होणारे त्रास (प्री- मेन्स्ट्रएल सिंड्रोम) कमी करण्यासाठी ‘ब’ जीवनसत्त्वे मदत करतात. सुक्यामेव्यातील असंपृक्त स्निग्ध पदार्थ चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. तसेच त्यातील ‘अर्जिनिन’ हा घटक आणि अमिनो आम्ले काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरतात.

हिरव्या भाज्या
फोलिक अॅसिड, कॅल्शियम, ‘के’ जीवनसत्त्व, ‘सी’ जीवनसत्त्व आणि मॅग्नेशियम या घटकांनी समृद्ध असलेल्या हिरव्या भाज्या रोजच्या जेवणात असाव्यातच. दिवसात एक वाटी हिरवी पालेभाजी खाल्ली तर उत्तमच. या भाज्या ‘सॅलड’ म्हणून कच्च्या खाता येतील. हलक्या परतलेल्या पालेभाज्याही चविष्ट लागतात. या भाज्यांमधील मॅग्नेशियम प्री- मेन्स्ट्रअल सिंड्रोममध्ये बरे वाटावे यासाठी फायदेशीर ठरते. तर फोलिक अॅसिड शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या घटकाची पातळी कमी करून हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी मदत करते. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही फोलिक अॅसिड फायदेशीर. 

सोयाबीन आणि त्याचे पदार्थ
अर्धी वाटी सोयाबीनचे दाणे शिजवून त्यांची उसळ जेवणात घेता येईल. २५० मिली सोया मिल्क किंवा शंभर ग्रॅम ‘टोफू’ (सोया पनीर) अशा स्वरूपातही सोयाबीन खाता येईल. सोया योगर्टही उत्तम. रजोनिवृत्तीच्या काळात अनेक स्त्रियांना अचानक ताप आल्यासारखे वाटण्याचा (हॉट फ्लशेस) त्रास होतो. अशा त्रासात बरे वाटण्यासाठीही सोयाबीनचे पदार्थ फायदेशीर ठरतात.