हुडहुडी भरवणारी थंडी, पहाटे खिडकीबाहेर पसरलेले धुके आणि वर्तमानपत्राबरोबर गरमागरम चहा. थंडीबद्दलची प्रत्येकाची स्वत:ची वेगळी कल्पना असते. म्हटले तर अगदी सुखावह आणि म्हटले तर तक्रारी वाढवणारा हा ऋतू. थंडीत आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. या ऋतूत काय करावे आणि काय टाळावे याची ही झलक..
थंडीत यापासून जपा-
*श्वसनसंस्थेचे आजार-
*सर्दी, पडसे, घसा दुखणे
*ताप- ‘फ्लू’सदृश आजार
*दम्याचा विकार बळावणे
*संधीवाताचा त्रास वाढणे
*त्वचेचे आजार
*पाण्याचा निचरा अधिक झाल्यामुळे डीहायड्रेशन
थंडीत हे खा..
*डाळी, सोयाबीन
*आले, लसूण
*बदाम, अक्रोड, शेंगदाणे, तीळ, जवस
*पालक, सरसूची भाजी आणि इतर
*हिरव्या पालेभाज्या
*गाजर, भोपळा, कोबी,
*टोमॅटोसारख्या फळभाज्या
*संत्री, पेरू, आवळा, डाळिंब अशी फळे
*गूळ, मध
*अंडी
*मासे
अशी घ्या काळजी-
*स्वेटर, कानटोपी जरूर घाला.
*हातमोजे, पायमोजे घातल्यानेही सांधे गरम राहतील.
*आंघोळीपूर्वी अंगाला तेल लावून मसाज केल्यास उत्तम.
*अगदी कडक पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने आंघोळ करा. म्हणजे त्वचा कोरडी पडणार नाही.
*आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
*सकाळच्या कोवळ्या उन्हात जॉगिंग करणे, चालणे असे हलके व्यायाम जरूर करा.
*थोडय़ा- थोडय़ा वेळाने कोमट पाणी प्या.
*भाज्यांच्या सूपसारखी गरम पेये थंडीत उत्तमच.
लहान बाळांनाही थंडीपासून जपा
*दोन वर्षांच्या आतल्या बाळांना ‘विंटर डायरिया’ म्हणजेच जुलाब होण्याची शक्यता असते. ‘रोटाव्हायरस’ या विषाणूमुळे हा डायरिया होतो. आधी उलटय़ा होऊन नंतर जुलाब सुरू होणे अशी याची लक्षणे असतात. याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. एस. के. ललवाणी म्हणाले, ‘‘या प्रकारच्या जुलाबांना साधारणपणे अँटिबायोटिक्सची गरज भासत नाही. जुलाब झाल्यावर बाळांच्या शरीरातील पाणी कमी होऊन त्यांना डीहायड्रेशन होते. त्यामुळे बाळांना थोडय़ा- थोडय़ा वेळाने लिंबू सरबत किंवा ओआरएस देणे गरजेचे आहे. दर तीन तासांनी बाळ लघवी करत असेल तर बाळाचे हायड्रेशन बरोबर आहे असे समजावे. डॉक्टर बाळांना ओआरएसबरोबर झिंकही देण्याचे सुचवतात. त्यामुळे जुलाबाची तीव्रता कमी होते. बाळ सहा आठवडय़ाचे झाल्यानंतर त्याला रोटाव्हायरसची लस देऊन आणली तर जुलाब न होण्यासाठी ते फायदेशीर ठरते.’’
*बाळांना पुरेसे गरम कपडे घालावेत.
*घरात दोन वर्षांच्या आतले बाळ असताना तापमान फारच कमी झाल्यास घरात हीटर लावून वातावरण गरम ठेवण्याचा प्रयत्न करावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा