आपण प्रवास नेहमीच करत असतो. आरामाचा, सुखाचा, विनात्रासाचा आणि विनाकटकटीचा प्रवास झाला, की आपण खूश होतो; पण कधी कधी काही प्रवाशांना अपघाताच्या भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्या परिस्थितीत डोके चालत नाही; पण तरीही प्रसंगावधान राखून हेल्पलाइनशी संपर्क साधणे संबंधित सर्वाच्याच हिताचे असते. अपघात घडलाच तर उपयोगी पडतील अशा या काही हेल्पलाइन्स- अर्थात आधी पोलिसांच्या १०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून अपघाताविषयीची सर्व माहिती पोलिसांना व्यवस्थित द्यायची. तातडीने पोलिसांकडून मदत मिळते. दिवसाच्या कोणत्याही वेळी या क्रमांकावर संपर्क साधता येतो.

राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास १०३३ या देश पातळीवरच्या हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधायचा. हा क्रमांक विनामूल्य आहे. दिवसाचे २४ तास या क्रमांकावरून मदत मिळते.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बससेवा पुरवणाऱ्या ‘बेस्ट’ या उपक्रमातील बसला अपघात झाल्यास ‘बेस्ट’च्या वाहतूक नियंत्रण कक्षाशी लगेचच संपर्क साधायचा. त्यासाठी त्यांचे हेल्पलाइन क्रमांक आहेत- २४१३७९३७, २४१४३६११, २४१८४४८९, २४१४६२६२.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात झाल्यास हेल्पलाइन ९८२२४९८२२४ वर संपर्क साधायचा किंवा हायवे पोलिसांच्या ०२२ २२६२६६५५ या हेल्पलाइनवर संपर्क साधायचा. अन्य हेल्पलाइन क्रमांक आहेत-  पनवेल विभाग हेल्पलाइन क्रमांक – ९८९००३६०८३, पुणे विभाग हेल्पलाइन क्रमांक- ९८९००३६०९०.

‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात ‘एस.टी.’च्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत- १८०० २२ १२५०, मुंबई सेंट्रल- ०२२ २३०७४२७२, ०२२ २३०७६६२२, परळ- ०२२ २४२२९९०५, सायन- ०२२ २४०७४१५७, पनवेल- ०२२ २७४८२८४४.

मुंबईतील लोकल ट्रेनशी संबंधित अपघात झाल्यास रेल्वेच्या २३००४००० किंवा १०७२१ या हेल्पलाइन्सवर तातडीने कळवायचे. याशिवाय अशा वेळी संपर्क साधायच्या इतर हेल्पलाइन्स आहेत- मध्य रेल्वे पोलीस- २४१५०६२०, पश्चिम रेल्वे पोलीस- २२०३९८००, कल्याण जंक्शन हेल्पलाइन- ०२५१ २३१७१८१, दादर हेल्पलाइन- ९८३३३३११११, छत्रपती शिवाजी टर्मिनस- ०२२ २२६९४०४०.

अपघातप्रसंगी मदत करणाऱ्या आणखी काही हेल्पलाइन्स पुढच्या शनिवारी.

-शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com 

Story img Loader