प्रदूषणविषयक हेल्पलाइन्सची ही माहिती नागरी वस्तीमधल्या ध्वनिप्रदूषणासंदर्भात काय करायचे, ते आपण मागच्या लेखात (३ सप्टेंबर) पाहिले. आता इतर प्रकारच्या प्रदूषणांच्यावेळी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती  घेऊ.

मुंबई आणि परिसरात लोकसंख्या झपाटय़ाने वाढतच आहे. साहजिकच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांचीही भरच पडत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ध्वनिप्रदूषण तर वाढतच आहे. कारखाने, उद्योग, विविध व्यवसाय असलेल्या या औद्योगिक क्षेत्रांत बरेचदा आवाजाची पातळी वरची असते. त्याचा त्रास सगळ्यांनाच होत असतो. त्याचबरोबर हवेत सोडल्या जाणाऱ्या विषारी वायुंमुळे होणारे प्रदूषण, सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदूषण, जमिनीत होणारे प्रदूषण, अशा अनेक प्रकारे प्रदूषण वाढत असते. या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार सामान्य माणसांना आहे.

औद्योगिक ध्वनिप्रदूषणासंबंधात, तसेच अन्य प्रकारच्या प्रदूषणांसंदर्भात तक्रार करायची असल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेल्पलाइनचे मुंबईतील क्रमांक आहेत – ०२२ २४०२०७८१,

०२२ २४०१४७०१, ०२२ २४०१०४३७.

आता आपण समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती –

पर्यावरणविषयक जागृती निर्माण करणारी  संस्था – दी बॉम्बे एनव्हायर्न्मेंट अ‍ॅक्शन ग्रुप.  हेल्पलाइन क्रमांक –   ०२२ २२४२३१२६.

ग्राहक हक्कांच्या जपणुकीसाठी कार्य करणारी संस्था – कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २२६२१६१२.

मुंबईच्या शहरी भागातील झोपडपट्टय़ा आणि पदपथांवर राहाणाऱ्या गरीब व्यक्तींसाठी कार्य करणारी संस्था – फेडरेशन ऑफ स्लम ड्वेलर्स ऑफ इंडिया. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २३०९६७३०,

०२२ २३००५६११.

मुंबईतील सर्व धर्म आणि जातींमध्ये सलोखा राखण्यासाठी झटणारी संस्था – मोहल्ला कमिटी. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २४९०११०३.

ग्राहक हक्कांसाठी कार्यरत संस्था – मुंबई ग्राहक पंचायत. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २६२८१८३२, ०२२ २६२८८६२४.

भ्रष्टाचाराविरोधात कार्य करणारी संस्था – पब्लिक कंसर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २४९७२७५२, ०२२ २४९३१६४२.

पर्यावरणविषयक जनजागृती करणारी संस्था – बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. हेल्पलाइन  क्रमांक – ०२२ २२८२१८११.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

 

 

 

Story img Loader