समाजातील वंचित आणि गरजू घटकांतील लोकांना विविध प्रकारे मदत करणाऱ्या म्हणजेच त्यांना हेल्पलाइन ठरणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांची ओळख आपण करून घेत आहोत. आज जरा वेगळे काम करणाऱ्या काही संस्थांची माहिती –
ई दान : हे एक पोर्टल आहे. नको असलेल्या पण चांगल्या स्थितीतल्या कपडे, लाकडी सामान, पुस्तके, पादत्राणे अशा वस्तू किंवा धान्य व पैसे दान करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि गरजूंसाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्यात दुवा साधण्याचे काम ही संस्था करते. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ९९२०४१४९४०. किंवा ‘ nocl-‘nocl@e-Daan.com येथे संपर्क साधावा.
डॉक्टर्स फॉर यू:
मुंबईतील काही हॉटेल्सची एक संघटना हॉटेल्सच्या खोल्यांमधले उरलेले साबण एकत्र करून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांचे पुन्हा साबण बनवतात. हे साबण चांगल्या प्रतीचे असतात. व ते मोफत वाटले जातात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत – ३२२२५३९१३, ७५०६३६३५८०.
एम.यू.एस.ई.: मुंबईतील युवकांनी स्थापन केलेल्या या स्वयंसेवी संस्थेतर्फे एक वेगळाच उपक्रम राबवला जातो. त्याचे नाव पिरिएड ऑफ शेअिरग. ग्रामीण भागातल्या महिला आणि मुलींना गरिबीमुळे मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखता येत नसल्याने त्याचा वाईट परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो. म्हणूनच त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचे काम ही संस्था करते. सॅनिटरी नॅपकिन्सचे एक पाकीट दर महिन्याला देऊन आपणही या कार्याला हातभार लावू शकतो. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ९८३३५००९८७, ९८३३७५०५६२, ९८१९३६५६१७.
फँड्री फाऊंडेशन : खूप गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन काही तरुण-तरुणींनी ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. समाजातील सधनांकडून त्यांना नको असलेल्या चांगल्या स्थितीतल्या वस्तू तसेच निधी गोळा करून समाजातील वंचित घटकांना देण्याचे काम ही संस्था करते. डहाणू, इगतपुरी, चिपळूण, संगमेश्वर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही दुर्गम भाग या ठिकाणी संस्थेचे कार्य चालते. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – ९९६७५४०३१३, ९०२९७१४३८७.
शुभांगी पुणतांबेकर – puntambekar.shubhangi@gmail.com