Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर

यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार नोकरदार वर्गासमोर आपल्याला नेमका किती कर भरावा लागणार आहे? आपण कोणत्या करश्रेणी अर्थात स्लॅबमध्ये आहोत? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी आम्ही हे इन्कमटॅक्स कॅल्क्युलेटर सादर करत आहोत. यात तुमची आवश्यक ती माहिती भरा आणि जाणून घ्या तुमची करश्रेणी नेमकी कोणती?

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर: FAQ

१. नव्या करप्रणालीनुसार मला माझ्या पगारावर किती कर देणं आवश्यक आहे?

तुम्हाला किती कर भरावा लागेल, हे तुमचा पगार कुठल्या टॅक्स स्लॅबमध्ये येतो, त्यावर अवलंबून असेल.

२. सर्वाधिक करमुक्त कमाईची मर्यादा किती आहे?

जुनी करप्रणाली:

एका व्यक्तीसाठी देशात सर्वाधिक करमुक्त कमाईची मर्यादा २.५ लाख रुपये इतकी आहे.

२०१८-१९ पर्यंत जर तुमची कमाई ३.५ लाख रुपये आहे, तर तुम्हाला कलम ८७ अ नुसार आर्थिक वर्षासाठी २५०० रुपये सूट मिळू शकत होती.

मात्र, २०१९-२० नंतर कलम ८७ अ नुसार मिळणारी सूट थेट १२ हजार ५०० रुपये इतकी करण्यात आली आहे. शिवाय, ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.

कलम ८०-क मध्ये करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा १.५ लाख इतकी आहे. अर्थात, ६.५ लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.

नवीन करप्रणाली (अर्थसंकल्प २०२३ नुसार):

यानुसार, एका व्यक्तीला जास्तीत जास्त करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ३ लाख निश्चित करण्यात आली आहे.

पण जर तुमचं एकूण उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्हाला कलम ८७ अ नुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी करपात्र रकमेमध्ये २५ हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. त्यामुळे तुमचं ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होईल.

जुन्या करप्रणालीमध्ये कलम ८७ अ नुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाख रुपये इतकीच आहे.

३. प्रत्येक व्यक्तीला प्राप्तीकर परतावा (Income Tax Return) भरणं आवश्यक आहे?

जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न करमुक्त सूट असणाऱ्या किमान मर्यादेपेक्षा कमी आहे, तर त्या व्यक्तीने प्राप्तीकर परतावा भरण्याची आवश्यकता नाही.

जुन्या करप्रणालीनुसार, ज्यांचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये आहे आणि नव्या करप्रणालीनुसार ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जर अशा व्यक्तींना प्राप्तीकर रिफंडसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी प्राप्तीकर परतावा भरणं आवश्यक आहे.

याशिवाय, इतर सर्व करदात्यांनी प्राप्तीकर परतावा भरणं आवश्यक आहे.

४. इन्कमटॅक्स कॅल्क्युलेटरने TDS मोजणं शक्य आहे का?

नाही. इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरने TDS (Tax Deducted at Source) मोजणं शक्य नाही.

यावर फक्त संबंधित आर्थिक वर्षातील देय प्राप्तीकरच मोजता येऊ शकतो.