मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने सनराईजर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमधलं आपलं तिसरं विजेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर सोशल मीडियावरही चेन्नईच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. दरम्यान कालच्या सामन्यात चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माच्या, ऐका आगळ्यावेगळ्या आयपीएल कनेक्शनबद्दलची चर्चा चांगलीच रंगताना दिसली.
कर्ण शर्माने कालच्या सामन्यात आपल्या आयपीएल विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली आहे. २०१६ साली हैदराबाद, २०१७ साली मुंबई आणि २०१८ साली चेन्नई या आयपीएल विजेत्या संघात कर्ण शर्माने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे आयपीएलची ट्रॉफी जिंकायची असल्यासं कर्ण शर्माला आपल्या संघात घ्या अशा प्रकारचे विनोद सोशल मीडियावर रंगताना दिसली.
IPL 2016 – Karn Sharma played for SRH, SRH won the trophy
IPL 2017 – Karn Sharma played for MI, MI won the trophy
IPL 2018 Karn Sharma played for CSK, CSK won the trophy #CSKvSRH #IPL2018Final @ChennaiIPL
— Nikhil Mane May 27, 2018
कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अंतिम सामन्यात हरभजन सिंहसारख्या महत्वाच्या गोलंदाजाला बसवून कर्ण शर्माला संघात जागा दिली. कर्ण शर्मानेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत कर्णधार केन विल्यमसनचा महत्वाचा बळी घेतला. दोन वर्षांनी पुनरागमन करुन आयपीएलचं विजेतेपद जिंकल्यामुळे सध्या चेन्नईच्या संघाचे चाहते भलतेच खुश आहेत. त्यामुळे अकराव्या हंगामात आता कर्ण शर्मा चेन्नईच्या संघाता हिस्सा राहतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.