आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेला सुरुवात होणार असून गतविजेते मुंबई विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळला जाईल. प्रत्येक संघ सध्या या स्पर्धेसाठी कसून सराव करतो आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी यंदाच्या हंगामा आंद्रे रसेल हा खेळाडू अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. KKR चा टीम मेंटॉर डेव्हिड हसीच्या मते रसेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली तर तो आयपीएलमद्ये द्विशतकही झळकावू शकतो. यंदा डेव्हिड हसी आणि मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम रसेलला बढती देण्याबाबत विचार करत आहेत.

अवश्य वाचा – एका क्लिकवर जाणून घ्या आयपीएल २०२० चं संपूर्ण वेळापत्रक

“रसेल तिसऱ्या क्रमांकावर आल्यामुळे संघाला जर फायदा होणार असेल तर त्याला संधी नक्कीच दिली जाईल. रसेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर किमान १० षटकं मैदानावर टिकला तर तो स्पर्धेत द्विशतकही झळकावू शकतो. रसेल काहीही करु शकतो.” डेव्हिड हसी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत होता. यंदाचा KKR चा संघ हा अधिक समतोल असून कोणताही कोणताही फलंदाज कुठेही फलंदाजी करु शकतो. पण रसेलच्या तिसऱ्या क्रमांकावर येण्यामुळे संघाला फायदा होणार असेल तर त्याला संधी का द्यायची नाही असा सवाल हसीने विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंद्रे रसेल सध्या कॅरेबिअन प्रिमीअर लीग स्पर्धेत खेळत असून बार्बाडोसविरुद्ध सामन्यातही त्याने आश्वासक कामगिरी करत अर्धशतक झळकावलं. त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला आंद्रे रसेलकडून खूप अपेक्षा असणार आहेत.

अवश्य वाचा – Video : याला म्हणतात नशीब ! बेल पडूनही आंद्रे रसेलला जीवदान…