करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि सर्व नकारात्मक घटनांना मागे टाकत युएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात झाली. अबु धाबीच्या मैदानात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने मुंबईला १६२ धावांवर रोखलं. या सामन्यात चेन्नईकडून फाफ डु-प्लेसिसने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या चपळाईचं दर्शन घडवलं.

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर मैदानात स्थिरावलेल्या सौरभ तिवारीने मारलेला उंच फटका सीमारेषेवर डु प्लेसिसने मोठ्या चपळाईने टिपला. यानंतर जाडेजाच्या गोलंदाजीवर डु-प्लेसिसने हार्दिक पांड्याचाही भन्नाट कॅच घेत क्षेत्ररक्षणात आपलं योगदान दिलं. या दोन कॅचमुळे सोशल मीडियावरही डु-प्लेसिसचं कौतुक होताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी मुंबईला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. मात्र मधल्या फळीत सौरभ तिवारीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपली छाप पाडता आली नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनीही मधल्या षटकांमध्ये दमदार पुनरागमन करत मुंबईच्या धावगतीला वेसण घातली.