आयपीएलच्या तेराव्या हंगामात ऐतिहासीक शारजाच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला राजस्थानच्या वादळी खेळीचा फटका बसला. संजू सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि अखेरच्या षटकांत जोफ्रा आर्चर यांनी केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे राजस्थानने सामन्यात २१६ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज लुन्गिसानी एन्गिडीने टाकलेलं अखेरचं षटक चेन्नईला चांगलंच महागात पडलं. मात्र या षटकामध्ये चार षटकार लगावणाऱ्या जोफ्रा आर्चरचे जुने ट्विट पुन्हा व्हायरल झालं आहे.
९ जानेवारी २०१५ रोजी आर्चरने केलेलं हे ट्विट असून यामध्ये केवळ ६६६६ असं लिहिण्यात आलेलं आहे. अनेक भारतीय क्रिकेट चाहते आता या साडेपाच वर्षांहून अधिक जुन्या ट्विटला रिप्लाय करत आहेत.
6666
— Jofra Archer (@JofraArcher) January 9, 2015
इतकचं नाही तर २०१५ सालीच आर्चरने केलेलं चेन्नईसंदर्भातील अन्य एक ट्विटही चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये सीएसकेला अडचणींचा समाना करावा लागेल असं आर्चर म्हणाला आहे.
Csk gonna struggle
— Jofra Archer (@JofraArcher) April 9, 2015
याचबरोबर शेवटच्या षटकामध्ये ३० धावा निघाल्याने आर्चरने २०१४ साली केलेले एका षटकात ३० धावा असं सांगणारं ट्विटही व्हायरल झालं आहे.
There is a Jofra tweet for every life situation!! #JofraArcher #IPL #RR #RRvsSK #RRvCSK #Dhoni #IPL2020 pic.twitter.com/5px8vKXANq
— Devanayagam (@Devanayagam) September 22, 2020
तर या षटकामध्ये दोन अनपेक्षित नो बॉल टाकल्याने दोन षटकार मारल्यावर १४ धावा मिळाल्याचा संदर्भ जोडत आर्चरचे अनपेक्षित भेट हे ट्विटही व्हायरल झालं आहे.
Unexpected gifts
— Jofra Archer (@JofraArcher) September 16, 2020
क्रिकेट चाहत्यांच्या आर्चरच्या या ट्विटवरील काही प्रतिक्रिया
१) तू तुझे ट्विट कधीच डिलीट करु नकोस
brother never delete your tweets I am searching my future and relating with your tweets.
wait.#jofraarcher https://t.co/AIZYhDjXI1— SANIHA SATHE (@Chasemeyou7) September 22, 2020
२) हा योगायोग नाही का?
This is getting spooky from @JofraArcher…
For context: https://t.co/RbWY2Kv7xY#IPL2020 #CSK pic.twitter.com/M3VNOea5kw
— Sportstar (@sportstarweb) September 22, 2020
३) त्याला कसं माहित होतं?
How did @JofraArcher know?https://t.co/ZKf1gPkfrb #RRvCSK #IPL2020 pic.twitter.com/S9hFzw97MS
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 22, 2020
४) त्याला सगळं ठाऊक असतं
Jofra Archer has tweets for everything!pic.twitter.com/6zQBfzGanR
— мв (@NayabPokiri) September 22, 2020
५) त्याला कसं कळलं
He Knew It. Jofra Archer Already Knew!#IPL2020 #RRvCSK #RR #RRvsCSK #Dream11IPL #jofraarcher pic.twitter.com/tTfBLumg5Y
— Dream 11 IPL 2020 – #IPL2020 #IPL #IPL13 (@CricketDailyIN) September 22, 2020
६) पाच वर्षांपूर्वीच बोलेला
What about this prediction 5 years ago ?? Absolute legend. @JofraArcher https://t.co/CK5dy011B1
— Eklavya Dwivedi (@EklavyaDwivedi) September 22, 2020
७)हाच खरा भविष्य सांगणारा
@JofraArcher the Nostradamus
Archer #CSKvsRR pic.twitter.com/abn7lhL6HS— Aayush Ranjan (@RAH_aayush) September 22, 2020
इंग्लंडचा नवोदित गोलंदाज जोफ्रा आर्चरने आजच्या सामन्यात आठ चेंडूंमध्ये चार षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. आर्चर हा त्याच्या मैदानावरील खेळाबरोबरच ट्विटसाठीही लोकप्रिय आहे. अनेकदा एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याने केलेले जुने ट्विट व्हायरल होत असतात. त्याचे काही भारतीय चाहते तर मजेत ‘आर्चर ही भगवान है’ असंही म्हणतात. आपल्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या आर्चर पुन्हा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.