जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. आयपीएलकडून आज १३ व्या सत्रातं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबुधाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे.

स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमध्ये प्रमुख संघापैकी एक मानला जातो. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई संघाचे जगभरात लाखो चाहते आहेत. चेन्नई आणि मुंबई यांच्यातल्या सामन्याला अनेकदा, भारत-पाक सामन्यांचं स्वरुपही दिलं जातं. पाहूयात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं वेळापत्रक…

१९ सप्टेंबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (शनिवार)

२२ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)

२५ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शुक्रवार)

२ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (शुक्रवार)

४ ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (रविवार)

७ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (बुधवार)

 १० ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु -(शनिवार)

१३ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)

 १७ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (शनिवार)

१९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (सोमवार)

२३ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – (शुक्रवार)

२५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (रविवार)

२९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (गुरुवार)

 

१ नोव्हेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)