मुंबई आणि बंगळुरु यांच्यात दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बंगळुरुने बाजी मारली. मुंबईने विजयासाठी दिलेलं ८ धावांचं आव्हान RCB ने सहज पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात RCB ने बाजी मारली असली तरीही मुंबई इंडियन्सच्या इशान किशनच्या खेळीचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. २०२ धावसंख्येचा पाठलाग करताना संघ संकटात सापडलेला असतानाही इशानने संयमी खेळी करत एक बाजू लावून धरत संघाचं आव्हान कायम राखलं. कायरन पोलार्डसोबत इशान किशनने ११९ धावांची भागीदारी केली.
अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत इशान किशन आणि कायरन पोलार्ड जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच किशन इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर ९९ धावांवर बाद झाला. अवघ्या एका धावेने किशनचं शतक हुकलं असलं तरीही आयपीएलमध्ये युएईत खेळत असताना मुंबई इंडियन्सकडून सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान किशनने मिळवला आहे.
Highest Score for MI in UAE
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.Ishan – 99 vs RCB*
Rohit – 80 vs KKR
Pollard – 78 vs SRH#RCBvMI— ComeOn Cricket IPL2020 (@ComeOnCricket) September 28, 2020
इशान किशन बाद झाल्यानंतर मुंबईला विजयासाठी एका चेंडूवर ५ धावांची गरज होती. परंतू कायरन पोलार्ड उदानाच्या गोलंदाजीवर चौकार मारण्यात यशस्वी ठरल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारली.