युएईत सुरु असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावधीवर पोहचला आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत येण्यासाठी प्रत्येक संघ गुणतालिकेत पहिल्या चार स्थानांवर येण्याच्या प्रयत्नात आहे. शारजाच्या मैदानावर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिनेश कार्तिकचा कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगतो आहे. RCB चा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

देवदत पडीकल आणि फिंच या RCB च्या सलामीच्या जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. शारजाच्या छोट्या मैदानाचा फायदा घेत RCB च्या दोन्ही फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. फिंचने दुसऱ्याच षटकात प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारत चेंडू थेट मैदानाबाहेर फेकला. पाहा, या भन्नाट षटकाराचा व्हिडीओ…

तेराव्या हंगामात RCB च्या संघाची कामगिरी चांगली राहिलेली आहे. एरवी गुणतालिकेत नेहमी तळातल्या स्थानावर असलेला हा संघ यंदा पहिल्या चार स्थानांच्या शर्यतीत आहे. त्यामुळे यंदा प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यात विराटसेना यशस्वी ठरते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.