मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे सनराईजर्स हैदराबादला आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १० धावांनी हैदराबादवर मात करुन पहिल्या विजयाची नोंद केली. जॉनी बेअरस्टो आणि मनिष पांडे जोडीने फटकेबाजी करुन संघाला विजयाच्या जवळ आणलं होतं. परंतू हे दोन्ही फलंदाज माघारी परतले आणि हैदराबादच्या डावाला गळती लागली.

अवश्य वाचा – Video : हलकासा टच आणि बॉल थेट सीमारेषेबाहेर ! बेअरस्टोचा भन्नाट षटकार पाहिलात का?

१९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गलाही सनराईजर्स हैदराबादने पहिल्या सामन्यात संधी दिली होती. परंतू आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेणं त्याला जमलं नाही. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर फॅन्सी शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बॉल प्रियमच्या हेल्मेटला लागला आणि बॉल थेट स्टम्पवर जाऊन आदळला. पाहा हा गमतीशीर व्हिडीओ…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवघ्या १२ धावा काढून प्रियम गर्ग माघारी परतला. बेअरस्टो आणि पांडे हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या मधल्या फळीतला एकही फलंदाज मैदानावर स्थिरावू शकला नाही. ज्याचा फायदा घेत बंगळुरुने सामन्यात बाजी मारली.