आयपीएलच्या तेराव्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या RCB ची गाडी नंतर रुळावरुन घसरली. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतरही रनरेटचं गणित सांभाळल्यामुळे विराटसेनेला प्ले-ऑफ चं तिकीट मिळालं. मात्र त्यानंतरही हैदराबादविरुद्धच्या सामन्यात RCB चा निराशाजनक खेळ सुरु राहिला. तेराव्या हंगामात RCB चं आव्हान संपुष्टात आल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी RCB च्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीला हटवण्याची मागणी केली. परंतू संघाचे प्रशिक्षक सायमन कॅटीच आणि डिरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स माईक हेसन यांनी विराटची पाठराखण केली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराट कोहली सांगणार नाही, मॅनेजमेंटला निर्णय घ्यावा लागेल !

“कर्णधारपदाचा विचार करायला गेलं तर विराटसारखा खेळाडू कर्णधारपदावर असणं हे आमचं भाग्यचं आहे. तो अत्यंत चांगला खेळाडू असून सर्व खेळाडू त्याचा आदर करतात. संघातील इतर तरुण खेळाडूंवर त्याने खूप वेळ खर्च केलाय, तो नेहमी त्यांच्यासोबत राहून त्यांना मार्गदर्शन करत असतो. विशेषकरुन देवदत पडीकलला त्याने चांगला पाठींबा दिला आहे. ही बाजू सहसा कोणीच बघत नाही. आम्ही शेवटपर्यंत लढत दिली, याचं श्रेय कर्णधार म्हणून विराटला मिळायलाच हवं.” एका वेबिनारमध्ये बोलत असताना कॅटीच यांनी आपलं मत मांडलं.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोहलीने १५ सामन्यांत ४५० धावा केल्या. परंतू महत्वाच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांतच होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळत करत RCB ने यंदा आपल्या चाहत्यांना विजेतेपदाची स्वप्न दाखवली होती. परंतू सलग ५ सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा RCB च्या चाहत्यांची निराशा झाली.

अवश्य वाचा – BLOG : RCB आणि विराटला नव्याने विचार करण्याची गरज !

Story img Loader