विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. गेल्या काही वर्षांत संघाची कामगिरी अतिशय खराब राहिलेली आहे. परंतू यंदा नवीन खेळाडूंना संघात स्थान दिल्यामुळे RCB च्या चाहत्यांना यंदा संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. १९ तारखेला स्पर्धेला सुरुवात होणार असून सर्व संघ युएईत कसून सराव करत आहेत. पहिल्या विजेतेपदाची आस असलेला RCB चा संघानेही जोरदार सरावाला सुरुवात केली आहे.

तब्बल ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर सर्व खेळाडू मैदानात उतरले असल्यामुळे सरावादरम्यान त्यांना योग्यवेळी थोडासा आराम आणि विरंगुळ्याचीही गरज असते. RCB संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अ‍ॅडम ग्रिफीथ यांनी संघातील गोलंदाजांसाठी यॉर्कर चॅलेंजचं आयोजन केलं होतं. यात अधिक भेदक यॉर्कर टाकणाऱ्या गोलंदाजाला पॉईंट देण्यात येत होते. या चॅलेंजदरम्यान विराट कोहलीचा एक वेगळाच अवतार चाहत्यांसमोर आला आहे. गल्ली क्रिकेटमध्ये आपला मित्र गोलंदाजी करत असताना त्याला प्रोत्साहन दिल्यासारखं विराट आपल्या प्रत्येक गोलंदाजाच्या यॉर्करवर मैदानात फूल टू धतिंग करत होता. पाहा हा व्हिडीओ…

नवदीप सैनी, उमेश यादव, शिवम दुबे, युजवेंद्र चहल आणि इतर गोलंदाजांनी यादरम्यान चॅलेंजमध्ये सहभाग घेतला. यंदाचा RCB संघ हा अधिक समतोल असून विजेतेपद मिळवण्याची आशा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाला आहे. त्यामुळे यंदा हा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – आजही त्याच जोशात फिल्डींग करतो जॉन्टी ऱ्होड्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क