आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल…पंचांनी दिलेले वादग्रस्त निर्णय हा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. आयपीएलच्या तेराव्या हंगामातही पंचांनी दिलेल्या दोन-तीन वादग्रस्त निर्णयांची चांगलीच चर्चा झाली होती. शनिवारी शारजाच्या मैदानावर झालेल्या हैदराबाद विरुद्ध बंगळुरु सामन्यातही पंचांचा असाच एक वादग्रस्त निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरतो आहे.
RCB ने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना दहाव्या षटकांत इसरु उदानाने टाकलेला एक चेंडू केन विल्यमसनच्या डोक्यावरुन जात होता. विल्यमसनने कसाबसा हा फटका खेळला, परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंचांनी हा चेंडू नो-बॉल ठरवला नाही. ज्यामुळे विल्यमसनलाही आश्चर्याचा धक्का बसला.
This was way above waist height, not sure why umpire missed this No Ball. pic.twitter.com/lwrschfcKF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 31, 2020
अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी पंचांच्या या वादग्रस्त निर्णयावर खोचक शब्दांत टीका केली.
No this isn’t a no ball @IPL pic.twitter.com/XcD4Gl0tT1
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 31, 2020
I honestly can’t believe that was not given a no ball ! Like seriously !!! #RCBvsSRH #IPL2020
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 31, 2020
Noball ?
— Jofra Archer (@JofraArcher) October 31, 2020
No balls are head high now???
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) October 31, 2020
दरम्यान, RCB ने दिलेल्या १२१ धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादने आश्वासक फलंदाजी करत ५ गडी राखत आव्हान पूर्ण केलं. हैदराबादच्या या विजयाने प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार झालेली असून मंगळवारी हैदराबाद आपला अखेरचा सामना मुंबईशी खेळणार आहे.त्यामुळे कोणते दोन संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.