आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ युएईत दाखल झाले आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्व खेळाडूंनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत सरावाला सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB च्या संघानेही आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. विराटने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असतानाचा आपला एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Proper session + proper humidity + great recovery = @royalchallengersbangalore

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराटच्या या फोटोवर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने विराटची मस्करी करत, टी-२० क्रिकेट आहे, कसोटी नाही. मोठे फटके खेळ असा सल्ला दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलच्या इतिहासात काही हंगाम वगळता विराट कोहलीच्या RCB संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. अनेकदा हा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावरच असतो. यंदाचा आयपीएल हंगाम हा युएईत आयोजित करण्यात आलेला आहे. RCB चा संघ हा नेहमी विराट आणि एबी डिव्हीलियर्सवरच अवलंबून असतो असं म्हटलं जातं. याच कारणासाठी RCB ने तेराव्या हंगामासाठी संघात काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. ज्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंच, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी होणं RCB साठी गरजेचं बनलं आहे.