आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाची स्पर्धा युएईत रंगणार असल्यामुळे सर्व संघांना विजयासाठी समान संधी आहे. दिल्ली, बंगळुरु आणि पंजाब या संघांना आतापर्यंत एकाही सामन्यात विजेतेपद मिळवता आलेलं नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली गेल्या हंगामात दिल्लीने चांगली कामगिरी केली. यंदा अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन यासारख्या खेळाडूंमुळे दिल्लीचा संघ अधिक मजबूत झाला आहे.

मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू सराव करत आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या संघात येण्यामुळे दिल्लीची ताकद आणखी वाढली आहे. कारण अजिंक्य हा फलंदाजी जेवढी चांगली करतो तेवढाच चांगला तो एक क्षेत्ररक्षक आहे. सरावादरम्यान कैफच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यच्या चपळतेचा एक नमूना तुम्हीच पाहा…

शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यासारख्या फलंदाजांमुळे अजिंक्यला यंदा संघात स्थान मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. परंतू सरावादरम्यान अजिंक्य पुरेपूर मेहनत घेताना दिसत आहे.