आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ युएईत कसून सराव करत आहेत. १९ सप्टेंबर रोजी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यासाठी अबु धाबी येथे सराव करत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सरावादरम्यान…आगामी सामन्यांमध्ये आपण कशा प्रकारची खेळी करणार आहोत याची एक झलक दाखवून दिली.

शेख झायेद स्टेडीयमवर सराव करत असताना रोहितने मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर गेला आणि मैदानाबाहेरुन जाणाऱ्या एका धावत्या बसला चेंडू लागला. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया पेजवर रोहितच्या या फटकेबाजीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

तब्बल ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर सर्व संघ मैदानावर पुनरागमन करणार आहेत. लॉकडाउनच्या काळात क्रिकेटपटू प्रदीर्घ काळ मैदानापासून दुरावले होते. त्यामुळे सलामीच्या सामन्यात मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो आणि रोहित शर्मा आपल्या लौकिकाला साजेशी फटकेबाजी करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – Family Time ! बायको आणि मुलांसोबत मुंबई इंडियन्स खेळाडूंची धमाल-मस्ती…