आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर सहज मात करत मुंबईने ५ गडी राखून विजय मिळवत लागोपाठ दुसऱ्या विजेतेपदावर मोहर उमटवली. कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आपण फॉर्मात असल्याचं सिद्ध केलं. अंतिम फेरीत रोहितने ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ६८ धावा केल्या.

अवश्य वाचा – …तर मुंबई इंडियन्सचा संघ टी-२० विश्वचषकही जिंकेल !

दुखापतीमुळे रोहितला यंदाच्या हंगामात फलंदाजीत कमाल दाखवता आलेली नसली तरीही कर्णधार म्हणून त्याने आपला प्रभाव पाडला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने रोहित शर्माकडे भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद जायला हवं अशी मागणी केली आहे. टी-२० सामने कसे जिंकायचे हे रोहित शर्माला माहिती असल्याचं वॉनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रोहितकडे कर्णधारपद दिल्यास विराट कोहलीला एक खेळाडू म्हणून स्वतःकडे लक्ष देता येईल असंही वॉनने स्पष्ट केलंय. इतर देशांमध्ये हा फॉर्म्युला चांगला चालत असल्याचंही वॉनने म्हणलंय.

अवश्य पाहा – सत्ता आमचीच ! मुंबईच्या या खेळाडूंनी गाजवलं यंदाचं IPL

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.